Diwali-Purchasing-Online
Diwali-Purchasing-Online 
पुणे

दिवाळीची खरेदी यंदा ऑनलाइनच

अक्षता पवार

पुणे - दरवर्षी दिवाळीत मी घरासाठी एक तरी इलेक्‍ट्रॉनिक वस्तू नक्की घेतो. त्यावेळी दुकानांमध्ये सेल असतो. यंदा, मात्र कोरोनामुळे दुकानात जाऊन खरेदी करणे सुरक्षित आणि परवडणारे नसणार. त्यात सध्या ऑनलाइन खरेदीसाठी सवलती मिळत आहे. त्यामुळे दिवाळीची खरेदी मी ऑनलाइनच करणार असल्याचे वैशाख नंबियार यांनी सांगितले.

वैशाख हा २८ वर्षीय तरुण खासगी कंपनीत काम करतो. त्याच्या कुटुंबात आई, बाबा आणि लहान भाऊ आहे. यंदा त्याने ऑनलाइनचा पर्याय निवडला आहे. दिवाळीच्या खरेदीची बदलती मानसिकता अभ्यासणारा ‘टीआरए रिसर्च’चा (ट्रस्ट रिसर्च ॲडव्हायसरी) ‘दिवाळी २०२० बाईंग प्रायॉरिटी रिपोर्ट’ नुकताच प्रकाशित झाला. यामध्ये ग्राहकांचे दिवाळी खरेदीबाबत मत, कोणत्या वस्तू जास्त प्रमाणात खरेदी केल्या जाऊ शकतील, याची माहिती घेतली. या सर्वेक्षणानुसार ६५ टक्के ग्राहकांनी दिवाळी खरेदीबद्दल सकारात्मक भावना दाखविली आहे. यामध्ये ग्राहकांनी कपडे, मोबाईल फोन, इलेक्‍ट्रॉनिक्‍स व दुचाकी खरेदीस सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. तसेच, ऑनलाइन खरेदीवर भर असल्याचेही स्पष्ट झाले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यंदाची दिवाळी अनेक ब्रॅंडसाठी महत्त्वाची ठरणार आहे. सद्यः परिस्थितीत अर्थव्यवस्था मंदावल्याने कोरोनापूर्वी ग्राहकांचे खर्च करण्याचे प्रमाण कमी झाले होते, असे टीआरएच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, एन चंद्रमौली यांनी सांगितले.

असे केले सर्वेक्षण

  • देशातील १६ शहरांतील ग्राहकांची मते घेतली
  • ९ जून ते १५ जुलै २०२० मध्ये केला सर्वेक्षण
  • राज्यातून पुणे, मुंबई व नागपूरचा समावेश 
  • कपडे, मोबाईल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, दुचाकींना सर्वाधिक पसंती
  • कार, लॅपटॉप व किचन अप्लायन्सेसला मध्यम प्राधान्य 
  • आरोग्य विमा व घराच्या नूतनीकरणाला फारशी पसंती नाही
  • ३५ टक्के ग्राहकांनी खरेदीबाबत दर्शविला नाही उत्साह  
  • मॉलमधून खरेदीस नागरिकांची सर्वांत कमी पसंती  
  • सर्व्हेमध्ये ७१ टक्के पुरुष तर २९ टक्के महिलांचा सहभाग

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT