kilbil
kilbil 
पुणे

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना किलबिल कट्ट्याने आदरांजली

अन्वर मोमीन

वडगाव शेरी - डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांनी देशाला दिलेल्या प्रेरणादायी विचारांचे स्मरण करण्यासोबतच विविध पुस्तकांचे वाचन करून वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त नव्याने साकारलेल्या किलबिल कट्याचे उदघाटन करण्यात आले.

विमाननगर येथे संत गोरोबा बाल विद्यानिकेतन शाळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नगर रोड सिटीझन फोरमच्या अध्यक्षा आरती सोनग्रा यांच्या हस्ते फीत कापून किलबिल कट्ट्याचे उदघाटन करण्यात आले. सुनीता भासले, विद्या थोरवे, स्मिता देशमुख, निलेश सोनग्रा, दत्ता निकाळजे  इम्तियाज शेख, गुरुकुलच्या प्राचार्य प्रीती माणेकर, प्रशालेचे मुख्याध्यापक सतीश पाटील, शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

श्रीसंत गोरोबा शिक्षण संस्थेच्या संचालिका किरण तावरे यांच्या संकलपणेतून आणि आर. के. सोनग्रा फाउंडेशनच्या सहकार्याने कट्ट्याची निर्मिती करण्यात आली आहे. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंतीनिमित्त पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यातील पुस्तकांचे वाचन विद्यार्थ्यांनी केले. तसेच विविध सहत्यिकांच्या पद्य रचना विद्यार्थ्यांनी सादर केल्या. वाचन चळवळ वाढावी, कट्यातून विद्यार्थ्यांनाचा आत्मविश्वास वाढावा यासाठी वाचन कट्याची कल्पना महत्वाची असल्याचे प्रतिपादन आरती सोनग्रा यांनी यावेळी केली. आभार मुख्याध्यापक सतीश पाटील यांनी मानले.

किलबिल कट्ट्यावर प्रसन्न वाटावे यासाठी येथील भिंतींवर रंगीबेरंगी फुलपाखरे आणि फुलांनी रंगकाम करण्यात आल्याने विद्यार्थी कट्ट्याकडे आकर्षित होतील अशी यामागील संकल्पना आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

Latest Marathi News Live Update : मुंबई स्थानकावर अमरावती एक्सप्रेसला किरकोळ आग

SCROLL FOR NEXT