पुणे

'पु.लं.ची प्रवासवर्णने माणसावर छाप सोडतात'

सकाळवृत्तसेवा

पुणे : 'आपल्या लेखणीतून जसेच्या तसे प्रसंग उतरविण्यास लागणारी भाषिक ताकद पु. ल. देशपांडे यांच्याकडे होती. पु.ल.यांची प्रवासवर्णने मला विशेष भावतात. कारण त्यांची प्रवासवर्णने कधीच गाईड करत नाहीत, तर माणसावर छाप सोडतात,' असे मत लेखक-कवी डॉ. आशुतोष जावडेकर यांनी पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित 'पुलोत्सव' या कार्यक्रमातील परिसंवादात व्यक्त केले. 

महाराष्ट्र साहित्य परिषद, पु. ल. परिवार आणि आशय सांस्कृतिक या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'पुलोत्सवात' आज 'भाषाप्रभू पु. ल.' या परिसंवादाचे आयोजन केले होते. या वेळी पु. ल. यांच्या व्यक्तिचित्रांचा सखोल अभ्यास करणाऱ्या डॉ. रेखा साने-इनामदार, समीक्षक गणेश मतकरी, मंगला गोडबोले हे परिसंवादाला उपस्थित होते. 

जावडेकर म्हणाले, ''पु. ल. यांना प्रेक्षकांची उत्कंठा वाढवत नेत वाचकाला लिखाणातून कुठे नेऊन सोडायचे आहे, हे चांगलं माहीत होतं. रोमान्स हा त्यांच्या लिखाणातला सर्वांत सुंदर, पण मर्यादा राखणारा भाग आहे.'' यामध्ये कवयित्री डॉ. साने यांनी पु. ल. यांच्या व्यक्तिचित्रांवर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, ''पु. ल. यांच्यापासूनच व्यक्तिचित्र आणि प्रवासवर्णन यांना खरी प्रतिष्ठा मिळाली. शीर्षकातूनच पु. ल. निम्म्याहून अधिक किमया साधतात. रोजच्या जगण्यातला भरगच्चपणा आणि भाषा हे त्यांच्या लेखणीतून तंतोतंत, पण आपोआपच येत गेलं. पु. ल. हे माणसात मिसळणारे पब्लिक मॅन होते.'' 

गणेश मतकरी यांनी पु. ल. यांच्या 'खुर्च्या भाड्याने आणल्या','सदू आणि दादू' या नाटकांचे उदाहरण देत म्हटले, 'ही नाटकं थेट माणसाला भिडणारी आहेत. त्यांची नाटकं ही प्रसंगांपेक्षा व्यक्तिरेखा रंगवणारी आहेत.' मंगला गोडबोले यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन सांभाळत परिसंवादातही सहभाग घेतला. त्या म्हणाल्या, ''माणसांची धडपड पकडण्याची सहजता पु. ल. यांच्या लेखणीतून आली आहे. कुणा एकाला जवळ न करता त्यांनी माणसांचे समूह निर्माण केले.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघन केल्याची तक्रार

SCROLL FOR NEXT