Dr Prakash Amte hospitalised in pune
Dr Prakash Amte hospitalised in pune  
पुणे

डॉ. प्रकाश आमटे पुण्यातील रुग्णालयात दाखल

सकाळ डिजिटल टीम

पुणे : ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांना हेअरी सेल ल्युकेमिया म्हणजेच ब्लड कॅन्सर असल्याचे वृत्त आहे. डॉ प्रकाश बाबा आमटे यांना न्यूमोनियाची सुद्धा लागण झाली आहे. सध्या त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (dr prakash amte hospitalised in pune)

डॉ प्रकाश आमटे हे पद्मश्री विजेते बाबा आमटे यांचे सुपुत्र असून गेल्या ४९ वर्षांपासून ते गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथे महारोगी सेवा समितीच्या "लोकबिरादरी प्रकल्प" या नावाने आदिवासी लोकांसाठी दवाखाना चालवत आहेत. भारत सरकारच्या 'पद्मश्री' पुरस्काराचे मानकरी असलेले प्रकाश आमटे यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील रॅमन मॅगेसेसे, मदर तेरेसा पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यांच्या जीवनावर आधारित डॉ.प्रकाश आमटे: द रिअल हीरो हा चित्रपट देखील २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता.

दरम्यान डॉ. प्रकाश आमटे यांचा मुलगा अनिकेत आमटे यांनी फेसबुकवर पोस्ट करत अधिकची माहिती दिली आहे. त्यांनी डॉक्टर प्रकाश आमटे हे 8 जून रोजी पुणे येथे बीजे मेडिकल कॉलेजमध्ये दीक्षांत समारंभाला आले असता त्यांना जास्त ताप व खोकल्याचा त्रास झाला म्हणून एका खासगी रुग्णालयात उपचार व तपासण्या सुरू आहेत असे त्यांनी सांगितले आहे. त्यांना फोन/मेसेज करू नये तसेच भेटायला येऊ नये असे देखील ते म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : तिथं जा नाश्ता वगैरे करा अन्... उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अमित शाहांना फडणवीस काय म्हणाले होते?

Indian Economy: भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी! UNने 2024 साठी जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला

Jalgaon News : दूषित पाण्याच्या नमुन्यांमध्ये लक्षणीय घट; डेंग्यूबाबत आरोग्य यंत्रणेच्या उपाययोजनांना यश

Latest Marathi News Live Update : गिरीश महाजन आणि भुजबळ यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरू

परदेशात पळून गेलेला खासदार भारतात आलाच नाही; आता 'रेड कॉर्नर नोटीस' बजावणे हाच एकमेव मार्ग शिल्लक!

SCROLL FOR NEXT