Maharashtra Corona Update : मुंबईत आज पुन्हा कोरोनाचा कहर!

Maharashtra Corona Update
Maharashtra Corona UpdateSakal Media

मुंबई : राज्यात कोरोना रूग्णांचा आकडा वाढताच आहे, मागील काही दिवसांपासून दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. आज राज्यात सोमवारी 1885 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. गंभीर बाब म्हणजे आज पुन्हा राजधानी मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा चिंता वाढवणारा आहे. राज्यातील एकूण कोरोना रुग्णांपैकी 1118 रुग्ण हे फक्त मुंबई शहरात आढळले आहेत.

दरम्यान आज राज्यात बरे झालेल्या रूग्णांची संख्या 774 इतकी राहिली. तर सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरात आढळले असून मुंबईत आज 1118 रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात आज कोरोनाच्या एका मृत्यूची नोंद आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 77,47,111 जण कोरोनामुक्त झाले आहेत ज्यापैकी आज 774 रुग्ण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 97.91 टक्के इतके आहे.

Maharashtra Corona Update
बंगालमध्ये ममता होणार विद्यापीठ कुलपति; विधानसभेत विधेयक मंजूर

राज्यातील कोरोनाची सक्रिय रुग्णांची संख्या देखील वाढत असून एकूण 17480 सक्रिय रुग्ण राज्यात आहेत. ज्यापैकी सर्वाधिक 11331 इतके सक्रिय रुग्ण मुंबईत आहेत. त्या खालेखाल ठाण्यात 3233 इतके सक्रिय रुग्ण आहेत. या सोबतच मुंबईत बी.ए. 4 चे तीन आणि बी. ए. 5 व्हेरिएंटचा एक रुग्ण आढळला आहे.

Maharashtra Corona Update
सदाभाऊंची माघार; प्रसाद लाड अन् भाई जगताप यांच्यात थेट होणार लढत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com