पुणे

दोड्याळ येथील सागर चव्हाणने पिकवली सेंद्रिय पद्धतीने ड्रॅगनची शेती ; पहिल्याच वर्षी घेतली दिड टन तर यावर्षी अपेक्षा सहा टन उत्पादनाची

CD

JEU26B07837

सेंद्रिय पद्धतीने ड्रॅगन शेती; पहिल्याच वर्षी दीड टन उत्पादन
दोड्याळच्या सागर चव्हाण यांची यशोगाथा; यंदा सहा टन उत्पादनाची अपेक्षा

सकाळ वृत्तसेवा
जेऊर, ता. २७ : दोड्याळ (ता. अक्कलकोट) येथील सागर रमेश चव्हाण यांची पाच एकर शेती जेऊर हद्दीत येते. आधुनिक शेतीची कास धरत त्यांनी दीड एकर क्षेत्रावर सेंद्रिय पद्धतीने ड्रॅगन फळांची लागवड केली आहे. पहिल्याच वर्षी दीड टन उत्पादन घेत त्यांनी या पिकात यश मिळवले असून, यंदा पाच ते सहा टन उत्पादनाची अपेक्षा आहे.

ग्रामीण भागात पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती तोट्यात जाऊ नये, यासाठी विविध पिकांचा समावेश करण्याचा सागर यांचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी ड्रॅगन फळांची सेंद्रिय शेती सुरू केली. म्हसवड येथून ‘जम्बो रेड’ जातीची २४०० रोपे आणून दीड एकरात लागवड करण्यात आली. योग्य मशागत, सेंद्रिय खतांचा वापर आणि नियमित देखभालीमुळे अवघ्या १४ महिन्यांत दीड टन उत्पादन मिळाले. हे उत्पादन त्यांनी सरासरी ९० रुपये प्रतिकिलो दराने स्वतः बाजारात विक्री केले.
यंदा पिकाची अधिक जोपासना करून, सेंद्रिय औषधोपचार व स्वतः तयार केलेल्या जीवामृताचा वापर करून उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तोडणी सुरू होणार असून, यंदा पाच ते सहा टन उत्पादनाचा अंदाज आहे. या प्रकल्पासाठी सुमारे आठ ते नऊ लाख रुपयांची भांडवली गुंतवणूक करण्यात आली आहे.
ड्रॅगन फळाला ‘कमलम’ किंवा ‘पिटाया’ असेही म्हणतात. निवडुंग कुळातील हे उष्णकटिबंधीय फळ फायबर, व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स, लोह आणि मॅग्नेशियमने समृद्ध आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, पचनक्रिया सुधारण्यास मदत करणे आणि त्वचेचे आरोग्य राखणे यासाठी हे फळ उपयुक्त मानले जाते. त्यामुळे ग्राहकांकडून याला चांगली मागणी आहे. ड्रॅगन फळ पिकाचे चौथ्या-पाचव्या वर्षापासून पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू होते आणि योग्य व्यवस्थापन केल्यास सुमारे २० वर्षे उत्पादन देता येते.

फळाचे होणारे विविध लाभ
रोगप्रतिकारशक्ती वाढणारे आणि आरोग्य संपन्न असे हे फळ व्हिटॅमिन सी ने समृद्ध असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांमध्ये फायदेशीर ठरते आणि त्वचेचे आरोग्य सुधारते. उच्च फायबर सामग्रीमुळे, हे बद्धकोष्ठता कमी करून पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.

प्रतिक्रिया
- शेतकरी बांधवानी जुन्या पद्धतीने शेती न करता आधुनिक तंत्रज्ञान वापरावे आणि भरपूर उत्पादन घ्यावे. स्वतः कष्ट करून पिकवावे आणि उत्पादन खर्च कमी करावे आणि बाजारात स्वतः विक्री करून उत्पादन वाढवावे.
- सागर रमेश चव्हाण, शेतकरी, दोड्याळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Pollution Crisis : नागपूरचा श्वास गुदमरतोय, संत्रानगरी धोक्याच्या उंबरठ्यावर; प्रदूषणाचा विळखा

Auqib Nabi: जम्मू-काश्मिरच्या गोलंदाजाने इतिहास रचला, रणजी स्पर्धेत अविश्वसनीय कामगिरी; गौतम गंभीर लक्ष आहे ना तुझं?

तोळ्यात नाही तर किलोत ! विजय-रश्मिकाच्या लग्नासाठी बनवले गेले एवढ्या वजनाचे सोन्याचे दागिने

Latest Marathi News Live Update : नांदेडमधील महापलिकेच्या सफाई कामगारांचे आज काम बंद आंदोलन

Walmik Karad: मनोज जरांगेंचं भाकीत खरं ठरणार? वाल्मिकचा मुलगा धनंजय मुंडेंच्या विरोधात बोलणार? फेसबुक पोस्टचा अर्थ काय?

SCROLL FOR NEXT