Drama
Drama 
पुणे

हौशी नाट्य स्पर्धेतून घडताहेत कलाकार (व्हिडिओ)

दीपेश सुराणा

पिंपरी - सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेतून शहरातील स्थानिक कलाकारांना मोठी संधी मिळत आहे. पाच वर्षांपूर्वी या स्पर्धेची शहरात प्राथमिक फेरी सुरू झाली. त्याला सध्या चांगला प्रतिसाद आहे. यातून कलाकारांची अभिनय व अन्य पातळ्यांवर जडणघडण होत आहे. 

शहरामध्ये २०१४ पासून हौशी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी सुरू झाली. त्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे विशेष प्रयत्न करण्यात आले. या स्पर्धेत यंदा १७ संस्थांचे नाट्यप्रयोग सादर होत आहेत. चिंचवड, भोसरी, पिंपळे गुरव, काळेवाडी अशा विविध परिसरातील नाट्यसंस्था, सोसायट्या आणि महाविद्यालयांतील ग्रुप सहभागी होत आहेत. त्याशिवाय, पुणे परिसरातील वडगाव धायरी, वडगाव शेरी, तळेगाव येथील संस्थांचादेखील सहभाग पाहण्यास मिळत आहे.

या स्पर्धेत शहरातील ८ ते १० संघ सहभागी होत आहेत. पूर्वी केवळ २ ते ३ संघ सहभागी होत असत. शहरातील स्थानिक कलाकारांना या स्पर्धेच्या माध्यमातून व्यापक व्यासपीठ मिळत आहे. 

स्पर्धेच्या निमित्ताने कलाकार घडण्याची प्रक्रिया होत आहे. त्याशिवाय नेपथ्य, प्रकाशयोजना, नाट्यसंगीत आदी पडद्यामागील महत्त्वाच्या बाबी, त्यातील बारकावेदेखील कलाकारांना शिकण्यास मिळत आहेत.

राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेतून काही कलाकारांची जडणघडण झाली आहे. ही जमेची बाजू आहे.
- राजेंद्र बंग, सह-समन्वयक, पिंपरी-चिंचवड केंद्र 

नावाजलेल्या नाट्य संस्थांकडून नवोदित कलाकारांना अपेक्षित संधी मिळत नाही. अशा परिस्थितीत या स्पर्धेमुळे नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळत आहे. महापालिकेने नाट्य कलाकारांना अल्प दरात नाटकाच्या तालमीसाठी सांस्कृतिक केंद्र उपलब्ध करून द्यावे.
- सुबोध पवार, कलाकार

या स्पर्धेच्या माध्यमातून अभिनयाबरोबर नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत आदी सर्व बाजू शिकण्यास मिळतात. नवे प्रयोग करता येतात.
- दीप्ती नातू, कलाकार

सहभागी संघ (वर्षनिहाय)
 वर्ष    संघ

 २०१४    १४
 २०१५    १८
 २०१६    १७
 २०१७    १९
 २०१८    १७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT