Pune News
Pune News Esakal
पुणे

Pune News: खेड शिवापुर टोल नाक्यावर सापडले ५ कोटींचे ड्रग, धडाकेबाज कारवाईत 4 जणांना अटक

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुणे पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. ५ कोटी रुपयांचे एक किलो मेथॅम्फेटामाइन ड्रग्ज पुणे पोलिसांनी जप्त केले आहेत. हे अमली पदार्थ जलद आणि दीर्घकाळ टिकणारे प्रभाव असलेले कृत्रिम औषध, उत्तेजक म्हणून बेकायदेशीरपणे वापरले जातात.

पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथक आणि कस्टम विभागाची संयुक्त कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी एकुण चार जणांना अटक करण्यात आली आहे.(Latest Marathi News)

29 मे रोजी एका वाहनामधून पुण्याजवळील खेड शिवापूर टोल नाक्यावर 850 ग्रॅम ड्रग जप्त करण्यात आले. याप्रकरणी सखोल तपास करताना पुणे पोलिसांनी लोणावळ्याजवळ आणखी 200 ग्रॅम मेथॅम्फेटामाइन जप्त केले आहेत.(Latest Marathi News)

हे अमली पदार्थ कोणाला विकणार होते आणि कुठून आणले होते, याची माहीती समोर आलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT