E-Bus
E-Bus Sakal
पुणे

पुणे : ई-बसच्या चार्जिंग अभावी या रविवारीही सिंहगडावर गोंधळ

निलेश बोरुडे

किरकटवाडी - पर्यटक व दुर्गप्रेमींना सिंहगडावर ये-जा करण्यासाठी सुरू करण्यात आलेली ई-बस सेवा प्रशासनाच्या नियोजनाअभावी सोय कमी परंतु मोठ्या प्रमाणात गैरसोयीची ठरताना दिसत आहे. रविवारी सिंहगडावर आलेले हजारांवर नागरिक रात्री साडेदहा वाजेपर्यंत ई-बसला चार्जिंग नसल्याने अडकून पडले होते. प्यायला पाणीही मिळत नसल्याने लहान मुलांच्या रडण्याचा आवाज येत होता. गैरसोय झाल्याने नागरिक मात्र वनविभाग व पीएमपी प्रशासनाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त करत होते. (Pune Sinhagad e-Bus News)

सायंकाळी सहा वाजल्यापासून रांगेत थांबून वैतागलेले शेकडो नागरिक रात्रीच्या अंधारात जीव धोक्यात घालून घाट रस्त्याने पायी चालत खाली आले. थोडी चार्जिंग झाल्यानंतर एक तासाच्या अंतराने एक बस सोडण्यात येत होती. गडावरील हॉटेल व्यावसायिक आठ वाजता हॉटेल बंद करून गेल्यानंतर नागरिकांना प्यायला पाणीही मिळणे कठीण झाले होते.

गाडीतळावर लाईटची व्यवस्था नसल्याने अंधारात एकच गोंधळ उडाला होता. पीएमपीच्या कर्मचाऱ्यांशी नागरिकांची बाचाबाची सुरू होती. योग्य नियोजन केल्याशिवाय प्रशासनाने असले अघोरी प्रयोग करु नयेत अशा संतप्त भावना नागरिक व्यक्त करत होते.

घाट रस्त्यावर एका बसवर दगडफेक

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार एका बसचे लायनर गरम झाल्याने बसचे ब्रेक लागणार नाही म्हणून चालकाने प्रवाशांना अर्ध्या रस्त्यात अंधारात सोडून दिले. त्यावेळी संतप्त झालेल्या एका प्रवाशाने मागून दगड मारल्याने ई-बसची मागची काच फुटली आहे. बस व्यवस्थापकांनी मात्र कोणतीही बस बंद पडली नसल्याचे म्हटले असून दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी दगडफेक केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे बस नेमकी कोणी फोडली हे माहीत नसले तरी प्रवाशांची गैरसोय झाली हे मात्र ई-बस व्यस्थापकांनी मान्य केले आहे.

चार्जिंग पॉईंट कधी वाढविणार?

बसची संख्या पुरेशी आहे परंतु चार्जिंग करण्याची व्यवस्था नसल्याने बस उभ्या राहत आहेत. मागील आठवड्यापासून वन विभाग व पीएमपी प्रशासन चार्जिंग पॉईंट वाढविणार असल्याचे सांगत आहे. प्रत्यक्षात मात्र अद्याप त्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नाही. चार्जिंग पॉईंट वाढविण्यासाठी सिंहगडावर व डोणजे येथील पार्किंग वर प्रत्येकी पाचशे के.व्ही. चा नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावा लागणार आहे. त्यामुळे ही सर्व प्रक्रिया लवकर होईल असे चित्र सध्या तरी दिसत नाही.

"सायंकाळी सहा वाजल्यापासून आम्ही रांगेत थांबलो होतो. चार्जिंग नसल्याने सर्व बस उभ्या होत्या. आठ वाजता विक्रेते हॉटेल बंद करुन गेल्याने प्यायला पाणी सुद्धा मिळत नव्हते. गडावरील पार्कींगवर गोंधळ सुरू होता. लहान मुले रडत होती. शेवटी आम्ही रात्री दहा वाजता पायी चालत खाली निघालो. प्रशासनाने अगोदर सर्व नियोजन करुन असले प्रयोग करावेत."

- पायी चालत गडावरुन खाली आलेले तरुण-तरुणी.

"नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी चार्जिंग पॉईंट वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या केवळ दोन चार्जिंग पॉईंट आहेत, त्यावरुन पंधरा ते वीस बस चालविणे अवघड आहे. वनविभाग आणि पीएमपीच्या अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आलेली आहे. सिंहगडावर अजून तीन व खाली डोणजे येथील पार्कींगवर पाच असे एकूण आठ चार्जिंग पॉईंट वाढविणे गरजेचे आहे. रविवारी रात्रीच्या अंधारात अज्ञाताने दगड फेकून बसची काच फोडली आहे."

- शेखर शर्मा, वरिष्ठ व्यवस्थापक, ओलेक्ट्रा ई-बस कंपनी.

"पर्यटक, दुर्गप्रेमी व स्थानिक नागरिकांनी कायद्याचे पालन करावे. कोणीही कायदा हातात घेऊ नये अन्यथा कडक कारवाई करण्यात येणार आहे. संबंधित विभागांनीही नागरिकांच्या तक्रारी व समस्या जाणून घेण्याबाबत व्यवस्था करावी."

- तेगबिरसिंह संधु, प्रभारी अधिकारी (भा.पो.से.), हवेली पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT