पुणे

ई-बसमुळे पुणे-पिंपरी ‘चार्ज’

मंगेश कोळपकर

पुणे - डिझेलचे वाढते दर, देखभाल-दुरुस्तीचा वाढता खर्च यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने ई-बसला प्रोत्साहन देण्यास सुरवात केली आहे. यासाठी प्रतिबस २५ ते ५० लाखांचे अनुदानही जाहीर केले आहे. देशातील प्रमुख शहरांत ई-बसचा वापर सुरू झाला असून, त्याला प्रवाशांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे. त्यामुळे ई-बसची संख्या वाढविण्याचा निर्णय अनेक परिवहन संस्थांनी घेतला आहे. यात आता पुणेही आघाडीवर असून, देशातील सर्वाधिक ई-बसमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड अल्पावधीतच ‘चार्ज’ होणार आहे. 

‘पीएमपी’मध्ये दाखल होणाऱ्या ई-बससाठी निगडी आणि भेकराईनगरमध्ये चार्जिंग स्टेशन उभारली आहेत. तीन-चार तासांच्या एका चार्जिंगमध्ये ई-बस सुमारे २०० किलोमीटर धावते. चार्जिंगचा प्रतियुनिट खर्च ६ ते ८ रुपये येतो. एका युनिटमध्ये बस ३ किलोमीटर धावते. ई-बसची मागणी देशात वाढू लागल्यामुळे अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनीही विविध शहरांमध्ये विक्रीसाठी धाव घेतली आहे. त्यातच केंद्र सरकारनेही अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळेही या बसचा खप वाढू लागला आहे. प्रामुख्याने भाडेतत्त्वावर या बस घेण्यात येत आहेत. त्यामुळे परिवहन संस्थांचीही भांडवली गुंतवणूक वाचली आहे. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्स्पोर्टहीने (सीआयआरटी) या बसच्या खरेदीला हिरवा कंदील  दाखविला आहे. ई-बसच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्चही उत्पादक कंपन्या पहिली तीन वर्षे करीत आहेत.

सध्या आमच्याकडे ५० ई-बस आहेत. त्यांची बीआरटी मार्गावर चाचणी सुरू आहे. त्या १५ दिवसांत प्रवाशांसाठी उपलब्ध होतील. जनमार्ग बीआरटीसाठी आणखी ३०० ई-बस विकत घेण्यात येणार आहेत. 
- धवल शहा, वाहतूक व्यवस्थापक, अहमदाबाद म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन  

ई- बस एसी असल्यामुळे प्रवाशांचीही त्यांना पसंती आहे. इंधनाचा खर्च कमी असल्यामुळे आणि प्रदूषणही कमी होत असल्यामुळे आम्ही आणखी १५० बस घेत आहोत. 
- एन. दीपक, जनसंपर्क अधिकारी, बंगळूर मेट्रोपॉलिटन ट्रान्स्पोर्ट कॉर्पोरेशन  

ठिकाण - सध्याच्या ई-बस - पुढील नियोजन  
- अहमदाबाद - ५० - ३००  
- बंगळूर - १३ - १५०  
- बेस्ट -  ३१  - ८०  
- कुलू, हिमाचल प्रदेश -  २५ - ५०

ई-बसमुळे प्रदूषण कमी होते अन् मुख्य म्हणजे इंधनावरील खर्चात होणारी बचत पीएमपीसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळेच आम्ही ई-बसचा पाठपुरावा करीत आहोत. प्रवाशांना आहे त्याच दरात एसी बसमधून प्रवास करायला मिळणार आहे.  
- नयना गुंडे, अध्यक्षा, पीएमपीएमएल

सध्या आमच्याकडे ५० ई-बस आहेत. त्यांची बीआरटी मार्गावर चाचणी सुरू आहे. त्या १५ दिवसांत प्रवाशांसाठी उपलब्ध होतील. 
- धवल शहा, वाहतूक व्यवस्थापक, अहमदाबाद म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन  

आम्ही एक वर्षापासून २५ ई-बस वापरत आहोत. देखभाल-दुरुस्तीचा अजूनही तरी प्रश्‍न आलेला नाही. इंधनावरील खर्चात आमची ४० टक्‍क्‍यांहून अधिक बचत होत आहे. 
- देवेंदर नरग, प्रादेशिक अधिकारी,  हिमाचल प्रदेश रोड ट्रान्स्पोर्ट, कुलू  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : आज कपिल पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार

SCROLL FOR NEXT