‘नासा’च्या उपग्रहाने टिपलेले उल्केचे छायाचित्र.
‘नासा’च्या उपग्रहाने टिपलेले उल्केचे छायाचित्र. 
पुणे

उल्कापातापासून बचावली पृथ्वी

सकाळवृत्तसेवा

पुणे - अमेरिकेतील अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ तर्फे वातावरणाला स्पर्शून जाणाऱ्या उल्केचे छायाचित्र शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आले. १८ डिसेंबर २०१८ रोजी ही महाकाय उल्का प्रशांत महासागरातील बेअरिंग समुद्रावरील आकाशात दिसल्याचे ‘नासा’ने स्पष्ट केले.

या उल्केमध्ये सुमारे १७३ किलोटन ऊर्जा निर्माण करण्याची ताकद होती. या ऊर्जेची तुलना करायची झाल्यास दुसऱ्या महायुद्धात हिरोशिमावर टाकलेल्या 
अणुबॉम्बच्या दहा पट ठरेल ! वातावरणात विघटित झाल्यानंतर काही मिनिटांतच उल्केच्या शेपटीचे छायाचित्र टिपण्यात उपग्रहाला यश मिळाले होते. उल्केच्या घर्षणामुळे हवेतील तापमानात प्रचंड वाढ झाली. यामुळे आसपासच्या ढगांचा रंग नारंगी झाला होता. त्यामुळे नासाच्या ‘टेरा’ या उपग्रहाला छायाचित्र मिळवणे सोपे झाले.

अवकाशात लहान, मोठे खडकाचे तुकडे फिरत असतात. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच हवेच्या घर्षणामुळे त्यांचे ज्वलन होते. अशा खडकांच्या तुकड्यांना ‘उल्का’, असे म्हटले जाते. यापूर्वी अनेक उल्कापात झाले आहेत. रशियातील चेल्याबिंस्क शहरात २०१३ मध्ये उल्कापात झाला होता. ४४० किलोटनाच्या उल्केमुळे एक हजार ५०० लोक जखमी झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT