Student_Exams 
पुणे

महत्त्वाची बातमी: दहावी-बारावीची बोर्ड परीक्षा ऑनलाइन होणार? तज्ज्ञांची खलबतं सुरू

मीनाक्षी गुरव

पुणे : दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा ऑनलाइन घेणे कठीण आहे. त्या संदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासमोर प्रस्ताव होता. परंतु माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांबाबत (बोर्डाच्या) शिक्षण विभागाच्या तज्ज्ञ मंडळींशी बोलणे सुरू आहे. ऑनलाइन परीक्षा घेणे कठीण आहे. तरी देखील काही मार्ग निघतो का याचा विचार सुरू आहे," अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकाल उशीरा लागला. त्यानंतर निकाल जाहीर झाल्यानंतर अडीच महिन्यांनी फेरपरीक्षेबाबत पावले उचलली गेली. त्यात आता कुठे शक्य त्या ठिकाणी नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यामुळे यंदा दहावी-बारावीची फेरपरीक्षा होणार का? आणि बोर्डाच्या परीक्षा कशाप्रकारे होणार? याबाबत पालक-विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे. याबाबत गायकवाड यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन बोर्डाच्या परीक्षेबाबत विचार सुरू असल्याची माहिती देत पालकांना काहीसा दिलासा दिला आहे.

"राज्यात प्रत्येक भागाच्या अडचणी वेगवेगळे आहेत. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा घेणे कठीण आहे. तरी देखील काही मार्ग निघतो का याचा विचार सुरू असून शिक्षण विभागाच्या तज्ज्ञ मंडळींशी चर्चा करण्यात येत आहे," असे गायकवाड यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या,"अनेक ठिकाणी आरोग्याची काळजी घेत हळू हळू शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नेटवर्क नसलेल्या ठिकाणी स्वतः शिक्षक जाऊन शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. तालुक्यांमध्ये आदर्श शाळा सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोरोनामुळे अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. येत्या काळात तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा ठरणार आहे. विविध ऑनलाइन माध्यमांचा वापर करावा लागेल. यासोबतच आदर्श शाळा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे."

विद्यार्थ्यांना शिक्षणपासून वंचित ठेवल्यास शाळांवर होणार कारवाई
"शिक्षण घेणे हा प्रत्येक विद्यार्थ्यांचा अधिकार आहे. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित ठेवणे चुकीचे आहे. मात्र याप्रमाणे वर्तन शाळा करत असतील त्यांच्यावर कारवाई होईल," असा इशारा देखील शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG सिलिंडर पुन्हा महागणार! केंद्र सरकारचे संकेत, वाढीमागचं कारणही स्पष्ट सांगितलं

Pune Water Cuts: खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा घटला; पुण्यात सोमवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा

Health Workers: राज्यात ४,१९३ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या, समुपदेशनाद्वारे प्रक्रिया

Baramati News : उपमुख्यमंत्र्यांची शासकीय वैदयकीय महाविद्यालयात सरप्राईज व्हिजिट आणि प्रशासनाची पळापळ....

Mumbai Strike: टँकर चालकांचा संप, बेस्टचाही आंदोलनाचा इशारा, उष्णतेचा तडाखा... मुंबईकरांवर ट्रिपल संकट; चिंता वाढली

SCROLL FOR NEXT