Ashish-Shelar
Ashish-Shelar 
पुणे

शिक्षणमंत्र्यांच्या पहिल्याच तासाला गोंधळ

सकाळ वृत्तसेवा

पुणे - नव्या शैक्षणिक वर्षात राज्याचे नवे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार कोणत्या नवीन योजना, संकल्पना आणि आराखडे जाहीर करतात, याची उत्सुकता असतानाच त्यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाचा पहिलाच तास गोंधळाचा ठरला. शालेय धोरणांबाबत गाऱ्हाणी मांडत पालकांनी शेलार यांच्यावर प्रश्‍नांचा भडिमार केला. परिणामी, पालकांचा रोष लक्षात घेऊन शेलार यांनी आपल्या भाषणासह कार्यक्रमच आटोपला. 

दरम्यान, अकरावी प्रवेशाच्या गोंधळाबद्दल प्रश्‍न विचारला असता शेलार यांनी हात जोडून निघून जाणे पसंत केले. त्यानंतरही ‘आमच्या मागण्या पूर्ण केल्याच पाहिजेत’, अशी आग्रही मागणी करीत पालकांनी शिक्षणमंत्र्यांना भेटण्याची मागणी लावून धरली; परंतु शेलार कार्यक्रमाच्या ठिकाणाहून बाहेर पडल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली. 

हेल्दी ग्लोब स्मार्ट व्हर्च्युअल एज्युकेशनच्या वतीने ‘पढेगा भारत’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी शेलार प्रमुख पाहुणे होते. त्यांचे भाषण सुरू असताना काही पालकांनी आपल्या समस्या मांडण्यास सुरवात केली. त्यात बहुतांशी पालकांनी शाळा व्यवस्थापनाच्या कारभारावर बोट ठेवत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, अशी तक्रार करीत होते. विद्यार्थ्यांना नापास करून मनमानी कारभार करत असल्याचा आरोप संतोष पालकमवार, जालिंदर बडदे, शैलेश शिंदे यांनी केला.

‘आठवीपर्यंत पास करायचा कायदा असूनही हचिंग हायस्कूलने मुलांना नापास केले. त्यानंतर तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मध्यस्थी केल्यानंतर मुलांना शाळेत येण्याची परवानगी दिली; परंतु शाळेने सूड बुद्धीने पुन्हा मुलांना नापास केले,’ असा आरोप करून पालक शेलार यांना भेटण्यासाठी आले होते. जाहीर कार्यक्रमात बोलू न दिल्याने शेलार यांना भेटण्याची मागणी केली; परंतु त्यांची भेट न झाल्याने पालकांनी संताप व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT