पुणे

Loksabha 2019 : दुबार मतदान रोखण्यासाठी दक्षता 

सकाळवृत्तसेवा

पुणे -  पुणे जिल्ह्यात दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. त्यामुळे ज्या मतदारांची नावे पुणे आणि बारामती मतदारसंघाबरोबर शिरूर अथवा मावळ मतदारसंघामध्ये आहेत, अशा दुबार मतदारांकडून दोनदा मतदान होण्याची शक्‍यता आहे. दुबार मतदान रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष दक्षता घेण्यात येत असून, या मतदारांची मतदान केंद्रनिहाय, तसेच विधानसभा मतदारसंघनिहाय यादी तयार करण्यात आली आहे. ज्या मतदारांची नावे दुबार आहेत, अशा मतदारांकडून दोन ओळखपत्रे मागविली जाणार आहेत. तसेच त्यांच्या अंगठ्यांचाही ठसा घेतला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. 

पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघासाठी पहिल्या टप्प्यात, तर मावळ आणि शिरूर मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. जिल्ह्यात मयत, दुबार आणि स्थलांतरित अशी एकूण 3 लाख 40 हजार मतदारांची नावे मतदारयादीत आहेत. त्यामुळे पुणे आणि बारामती मतदारसंघात नाव असण्याबरोबरच मावळ अथवा शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतदारयादीत नाव असल्यास या दुबार मतदारांकडून या ठिकाणी मतदान होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे. 

मतदान केंद्रनिहाय, तसेच विधानसभा मतदारसंघनिहाय दुबार मतदारांची यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी प्रत्येक मतदान केंद्रावर उपलब्ध असणार आहे. दुबार नाव असलेली व्यक्ती मतदानासाठी आल्यावर त्यांच्याकडे दोन ओळखपत्राची मागणी करून ती तपासली जाणार आहेत. तसेच मतदान नोंद वहीवर सहीबरोबरच त्या व्यक्तींच्या अंगठ्याचा ठसाही घेतला जाणार आहे. मतदान झाल्यावर ही यादी लिफाफ्यात ठेवली जाणार आहे. जर एखाद्या व्यक्तीने दुबार मतदान केल्याचे आढळल्यास त्या मतदारावर कारवाई करण्यात येणार असल्याचे राम यांनी सांगितले. 

118 मतदान केंद्रे संवेदनशील  
पुणे लोकसभा मतदारसंघात 118 संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. ज्या मतदान केंद्राच्या मतदारयादीमध्ये मतदारांचे फोटो असण्याचे प्रमाण कमी आहे, दुबार मतदारांची संख्या आणि बोगस मतदान झाले आहे अथवा मतदार यादीमध्ये कुटुंब जोडणी होण्याचे प्रमाण कमी आहे, अशी मतदान केंद्रे प्रामुख्याने संवेदनशील मतदान केंद्रे म्हणून जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहेत. या संवेदनशील मतदान केंद्रांवरील मतदानाचे थेट प्रक्षेपण निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT