काँग्रेस भवन - लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची पुरती वाताहत झाली. आज दिवसभर काँग्रेस भवनात एकही कार्यकर्ता फिरकला नाही.
काँग्रेस भवन - लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची पुरती वाताहत झाली. आज दिवसभर काँग्रेस भवनात एकही कार्यकर्ता फिरकला नाही. 
पुणे

Election Results : पराभवामुळे काँग्रेस भवनामध्ये शुकशुकाट

सकाळवृत्तसेवा

पुणे - निवडणुकीच्या धामधुमीत गेले दीड ते दोन महिने काँग्रेस भवनात उत्साहाचे वातावरण होते. मात्र मतमोजणी सुरू झाल्यानंतर पक्षाच्या उमेदवाराचा पराभव दिसू लागल्याने परिसरात शुकशुकाट व निराशाचे वातावरण पसरल्याचे पाहायला मिळाले. पुण्यातच काय, राज्यातील अन्य ठिकाणीदेखील पक्षाच्या विजयाची चिन्हे दिसत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह होता. 

निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी सकाळी काँग्रेस भवनात कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. मात्र मतमोजणी जसजशी पुढे सरकली, तसतसे कार्यकर्ते निरुत्साही होऊन भवनामधून बाहेर पडतानाचे चित्र दिसून आले. कार्यालयात तुरळक कार्यकर्त्यांची ये-जा सोडली, तर दिवसभर कोणीही या ठिकाणी फिरकले नाही. 

शहरातील पक्षाच्या नेत्यांनीदेखील इकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. कार्यालयाच्या आवारात तीन-चार गाड्या आणि तुरळक कार्यकर्ते 
असे चित्र दिवसभर पाहावयास मिळाले.

मतमोजणीत काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी पहिल्या फेरीपासूनच पीछाडीवर गेल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून आली. पराभवाची चाहूल लागल्याने सकाळपासून पक्षाच्या नेत्यांनी कार्यालयात येण्याचे टाळले. मतमोजणीच्या सुरवातीच्या काही फेऱ्यांमध्ये काँग्रेसचे उमेदवार पीछाडीवर गेल्याने सकाळी काँग्रेस भवनामध्ये आलेले काही कार्यकर्तेही दुपारनंतर निघून गेल्याने दुपारनंतर कार्यालयामध्ये पाच-दहा कार्यकर्त्यांव्यतिरिक्त कोणीही दिसले नाही. राज्य आणि देशपातळीवर काँग्रेसला अपेक्षित यश मिळताना दिसत नसल्याने कार्यकर्ते नाराज दिसून आले. 

याबाबत काँग्रेसचे कार्यकर्ते सनमीतसिंग चौधरी म्हणाले, ‘‘निवडणुकीचे निकाल धक्कादायक आहेत. अशा निकालाची अपेक्षा नव्हती. पक्षाची पुनर्बांधणी करून नवीन दमाच्या कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे. शहरामध्ये पक्षाला सक्षम नेतृत्वाची गरज आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

SCROLL FOR NEXT