crime sakal
पुणे

इलेक्ट्रीक मोटर चोरी करणारे दोघे गजाआड

५ इलेक्ट्रीक मोटार व एक मोटारसायकल जप्त

राजेंद्र लोथे

चास : चासकमान कॅनॉलवर बसविलेल्या इलेक्ट्रीक मोटर चोरी करणारे दोघे गजाआड, त्यांचेकडून ५ इलेक्ट्रीक मोटार व एक मोटारसायकल जप्त दिनांक २१/०८/२०२२ रोजी सायंकाळी 6 वाजता ते दिनांक २२/०८/२०२२ रोजी 6 वाजता चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने मौजे कडधे ता.खेड जि.पुणे येथे गोठ्याचे उघडया दरवाजातून प्रवेश करून गोठ्यामधील एक पिवळसर रंगाची कॉम्पटन कंपनीची ५ एच.पी पाण्याची विजेवर चालणारी मोटार चोरून नेली,त्याबाबत खेड पोलीस स्टेशन ५३९/२०२२ भा.द.वि. कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला

सदर गुन्हयाचा तपास चालू होता. दिनांक २२/०८/२०२२ रोजी 4 वाजुन्याचे सुमारास पोलीस नाईक सचिन जतकर, पोलीस अंमलदार निखील गिरीगोसावी, स्वप्नील गाढवे असे चोरीच्या गुन्हयाचे अनुशंगाने कडधे गावचे हद्दीत खेड ते वाडा जाणारे रोडवर कडधे कॉलनीजवळ एक काळे रंगाचे पॅशन मोटारसायकलवर दोन इसम हे खेड बाजूकडे गाडीचे मध्यभागी पोत्यामध्ये काहीतरी भरून संशयीतरीत्या जाताना दिसले. त्यांना पकडून नाव पत्ता विचारले असता त्याचे नाव त्यांनी कैलास मारूती गावडे वय २१ वर्षे रा. खंडोबामाळ, कडधे ता. खेड जि.पुणे, २) दिलीप तुकाराम केदारी वय २४ वर्षे रा. खंडोबामाळ, कडधे ता.खेड जि.पुणे असे असल्याचे सांगीतले. त्यांचेकडे त्यांचे गाडीचे सिटवर मध्यभागी ठेवलेले पोते उघडून पाहीले असता त्यामध्ये एक पाण्यातील चोरीस गेलेली इलेक्ट्रीक मोटार मिळून आली

ती मोटार त्यांनी कडधे येथून एका गोठयातून चोरी केली असल्याची कबूली दिली असून वर नमुद वर्णनाची आरोपीचे ताब्यात मिळून आलेली विजेवर चालणारी पाण्याची मोटर व एक काळे रंगाची हिरो कंपनीची पॅशन प्रो गाडी नंबर एम. एच. १४. ई. जे. ५७२४ मिळून आले असून सदरची मोटार व पॅशन प्रो मोटारसायकल जप्त करण्यात आली असून त्यांची रिमांड घेवून त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी आणखी बुटटेवाडी येथील कॅनॉलवरील ४ इलेक्ट्रीक मोटरी चोरी केली असल्याची कबूली दिली असून त्यांचेकडून कडधे व बुटटेवाडी येथील एकूण ५ मोटरी व एका मोटारसायकलसह एकूण ७५,०००/- (पंचाहत्तर हजार) रु. किं.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहेत.

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक मितेश गट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील,

पोलीस निरीक्षक सतिशकुमार गुरव, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस भारत भोसले तसेच पो.हवालदार संतोष घोलप, पो.ना. सचिन जतकर, पोलीस अंमलदार निखील गिरीगोसावी, स्वप्नील गाढवे, पो.ना.शेखर भोईर, सागर शिंगाडे यांनी केली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हा व्हिडिओ खास आहे... नातं रक्ताचं नव्हतं, पण... जंगलात वाजली शहनाई, CRPF जवानांनी निभावलं वधूच्या भावाचं कर्तव्य

Ashadhi Wari 2025 : बंधुभेटीच्या सोहळ्याने अवघे वैष्णव भावुक; संत ज्ञानेश्वर महाराज-संत सोपानदेवांच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

Satara Crime : धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक; नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Latest Maharashtra News Updates : अमित शहांचा आज पुणे दौरा, वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT