पुणे

‘बीएमसीसी’च्या आवारात रंगला माजी विद्यार्थी मेळावा

सकाळवृत्तसेवा

पुणे - तब्बल तीन तप म्हणजे ३६ वर्षे बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या (बीएमसीसी) सेवेत असलेले माजी प्राचार्य डॉ. अनिरुद्ध देशपांडे आणि तितकीच वर्षे विद्यार्थ्यांमध्ये घालविलेले प्रा. व्ही. ए. जोशी या दोन मास्तरांचा तास रविवारी (ता. १३) पुन्हा भरला ! पण, तो वर्गात नव्हे, तर महाविद्यालयाच्या पटांगणात. ऐंशी वर्षांच्या जोशी मास्तरांनी तब्बल २२ वर्षांनी घेतलेल्या तासात विद्यार्थ्यांसाठी कोणताही ‘धडा’ नव्हता. करड्या शिस्तीने विद्यार्थ्यांना धडकी भरविणाऱ्या जोशी मास्तरांनी मोळका संवाद साधत, मला विद्यार्थी आणि बीएमसीसीच्या वस्तूने घडविल्याची भावना व्यक्त केली आणि घंटा वाजण्याआधीच आपला तास संपविला.

तेव्हाच, देशपांडे आणि जोशी मास्तरांचा तास अर्थात, मनोगत संपल्याचा आनंद घेऊन माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांची गाळाभेट आणि ‘सेल्फी’ घेत धमाल केली. सेवानिवृत्त प्राध्यापकांचा तास आणि माजी विद्यार्थ्यांची धमाल पाहायला मिळाली ती, ‘बीएमसीसी’च्या आवारात रंगलेल्या माजी विद्यार्थी मेळावा आणि पुरस्कार सोहळ्यात ! फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असूनही ‘बीएमसीसी’त सर्वाधिक वेळ घालविणारे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी आपल्या खास शैलीत तरुणाईतील किस्से ऐकविले तेव्हा, या मेळाव्यात जान आली. महाविद्यालयाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त बीएमसीसी माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन आले होते. त्यात डॉ. देशपांडे आणि प्रा. जोशी यांना ‘गुरुवर्य पुरस्कार,’ तर एअर मार्शल (सेवानिवृत्त) डॉ. सदानंद कुलकर्णी, निवेदक सुधीर गाडगीळ यांना ‘प्राइड ऑफ बीएमसीसी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) दीपक आगाशे यांना ‘बीएमसीसी गौरव’ पुरस्कार दिला.

राज्य खादी  महामंडळाचे अध्यक्ष विशाल चोरडिया, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ, संघटनेचे कार्याध्यक्ष अरुण निम्हण, बाळासाहेब अनास्कर, सचिन नाईक, राजेंद्र मराठे हे व्यासीपठावर होते. समाजकारण, राजकारण, कला, साहित्यासह विविध क्षेत्रांतील माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. 

आठवणींचा कट्टा अन्‌ किश्‍श्‍यांची मैफल
कार्यक्रम आटोपताच अनेकांनी आपल्या आठवणींचा कट्टा गाठून त्यावर फोटोसेशन केले, तर पावलोपावली जुन्या किश्‍श्‍यांच्या मैफलीही रंगल्या होत्या. हा सोहळ्या पाहण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापकही उपस्थित होते. ‘बीएमसीसी’च्या आवारातील हा सोहळा जुन्या आठवणींनी बहरला होता. तेव्हाच या साऱ्या आठवणींची साक्षीदार ठरलेली ‘बीएमसीसी’ची इमारतही दिव्यांच्या लखलखटात उजळली  होती. तिलाही प्रत्येक जण आपल्या मोबाईलच्या कॅमेरात टिपत होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवार, सुप्रिया सुळे मतदानासाठी दाखल

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

IND vs BAN Women's T20 : चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यातही भारताचा बांगलादेशवर विजय

Mumbai News : नरेश गोयल यांना उच्च न्यायालयाचा दिलासा! २ महिन्यांचा मिळाला अंतरिम जामीन

SCROLL FOR NEXT