पुणे

पु.लं देशपांडे यांच्या दुर्मिळ छायाचित्र व व्यंगचित्रांचे प्रदर्शन

सकाळवृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असलेले लेखक आणि अष्टपैलू कलावंत, ज्यांच्या निखळ विनोदांनी अनेक दशकं लहान-थोर साऱ्यांनाच हसवलं.. आजही ज्यांच्या साहित्यकृती वाचून मन प्रफुल्लित होतं.. असे पुलं.. अर्थात पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष उद्यापासून सुरू होत आहे. 8 नोव्हेंबर हा पुलंचा जन्मदिवस.

उद्यापासून सुरू होणाऱ्या या जन्मशताब्दीनिमित्त साहित्यवेध प्रतिष्ठान आणि संवाद संस्थेने पुलंच्या दुर्मिळ छायाचित्रांचे व पुलंच्या आयुष्यावर विविध व्यंगचित्रकारांनी काढलेल्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. आज ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस, व्यंगचित्रकार आलोक निरंतर, लेखक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या उपस्थितीत या छायाचित्र- चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन पार पडले. पुलंच्या व्यक्तिमत्वाची, आयुष्याची चित्ररूपाने ओळख करून देणारे हे प्रदर्शन आहे.

विविध साहित्यिक, कलाकारांसोबतचे पुलंचे दुर्मिळ छायाचित्रे, गायन-वादन करणारे पुलं, पत्नी सुनीताबाई यांच्यासोबत टिपलेले खास क्षण या प्रदर्शनात पाहता येणार आहे. अनेक व्यंगचित्रकारांनी पुलंच्या साहित्यातील गाजलेल्या व्यक्तिरेखा, गाजलेली वाक्ये, विनोद यावर आधारित काढलेली व्यंगचित्रे हे प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य. 
अनेक नागरिकांनी आज हे प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील सभागृहात हे प्रदर्शन 9 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत सर्वांना पाहण्यासाठी खुले असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

IPL 2024 LSG vs RR Live Score : शतकी भागीदारी रचणारी राहुल - हुड्डाची जोडी फुटली; लखनौ 150 च्या जवळपास पोहचली

DC vs MI, IPL 2024: टीम डेविडचा कडक षटकार, मात्र संपूर्ण स्टेडियम हळहळलं; पाहा कोण जखमी झालं?

Hardik Pandya DC vs MI : सतत हसत असणाऱ्या पांड्या दिल्लीविरूद्ध मात्र जाम भडकला; Video व्हायरल

SCROLL FOR NEXT