चिखली - पारंपरिक अवजार पांभरच्या साह्याने सोयाबीन पेरताना शेतकरी.
चिखली - पारंपरिक अवजार पांभरच्या साह्याने सोयाबीन पेरताना शेतकरी. 
पुणे

भूमिपुत्र जपतोय शहरातही कृषी संस्कृती

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - चिखलीतून मोईकडे जाताना इंद्रायणी नदी पुलाजवळ डाव्या बाजूला शेतात पेरणी सुरू होती. थोडा वेळ थांबून पेरणीची पद्धत जाणून घेतली. पांभर, बैलजोडी, कासऱ्याचा उपयोग, बियाण्याची निवड, फराट याची माहिती घेतली आणि जाणवले की, उद्योगनगरीच्या परिसरात कितीही सिमेंटचं जंगल वाढत असलं, शेती जाऊन टोलेजंग इमारती उभ्या राहात असल्या, तरी काही भूमिपुत्र आजही उरल्या-सुरल्या शेतीवर आणि जित्राबांवर जीवापाड प्रेम करताहेत. आपली कृषी संस्कृती जपताहेत.

इंद्रायणी नदीलगतच्या शेतात चार फणी पांभरने मोईतील शेतकरी अशोक गवारी सोयाबीनची पेरणी करीत होते. शेत मात्र चिखलीतील भुजबळ कुटुंबाचे होते. त्यातील विजय भुजबळ पांभरच्या मागे फराट फिरवत होते. त्यामुळे पेरलेले बियाणे मातीखाली झाकले जात होते. पाखरांनी बी खाऊ नये, यासाठी फराट फिरवणे गरजेचे असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

गवारी यांच्या पत्नीही पेरणीसाठी आल्या होत्या. पांभरला बांधलेल्या ओटीतील बियाणे संपल्यानंतर त्या बांधावर ठेवलेल्या पिशवीतून आणून देत होत्या. गवारी म्हणाले, ‘‘दोन एकर शेतासाठी ५० किलो बियाणे लागते. पावसावरच शेती असल्याने उत्पादन वेगवेगळे असते. सर्व खेळ निसर्गावर अवलंबून असतो.’’ 

भुजबळ हे गवारी यांच्या शेतात पेरणीसाठी गेले होते. त्यामुळे गवारी कुटुंब भुजबळांच्या पेरणीसाठी आले होते. विना मोबदला. त्याला ‘इर्जिक’ किंवा ‘सावड’ करून शेती करणे असे म्हटले जाते. कारण, शहरात अनेक कारखाने, कंपन्या आल्या. औद्योगीकरणामुळे शहरीकरण वाढले. शेतीक्षेत्र कमी 
होऊन निवासी क्षेत्र वाढले. शेतकरी व शेतमजुरांची संख्या घटली. त्यामुळे शेतमजूर मिळेनासे झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT