Farmer-Money-Lender
Farmer-Money-Lender 
पुणे

इंदापूरला सावकार जोमात शेतकरी कोमात

राजकुमार थोरात

वालचंदनगर - खासगी सावकारांच्या जाचामुळे इंदापूर तालुक्‍यातील शेतकरी व छोटे व्यावसायिक अडचणीत आले अाहेत. सावकार जोमात व शेतकरी कोमात अशी तालुक्यात परिस्थिती आहे.  

गोतोंडी येथील युवकाचा सावकारीच्या पैशातून खून झाल्याची घटना नुकतीच घडली. तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील लासुर्णे, जंक्‍शन, बोरी, बेलवाडी, काझड, अंथुर्णे परिसरातील अनेक शेतकरी व छोटे व्यावसायिक खासगी सावकारीच्या जाळ्यात अडकले आहे. शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बॅंकेतर्फे पीककर्ज व मध्यम मुदतीचे कर्ज मिळते. मात्र द्राक्ष व डाळिंब छाटणी हंगामावेळी शेतकऱ्यांना पैशाची गरज पडल्यावर शेतकरी खासगी सावकाराकडून प्रति महिना ३ ते २० टक्के व्याजाने पैसे घेतात. पैसे देतानाच सावकार पहिल्या महिन्याचे व्याज कापून घेतो. महिना संपताच व्याजाच्या पैशासाठी तगादा लावून मानसिक त्रास देण्यास सुरवात करत असल्याचे प्रकार घडत आहेत. सावकारीच्या जाचाला अनेक शेतकरी, व्यावसायिक कंटाळले आहेत. मात्र भीतीपोटी पोलिसांत तक्रार देण्यास जात नसल्याचे दिसून येत आहे.

खूष खरेदीखतावर भर 
खासगी सावकार छोट्या रक्कमा देताना कोरे धनादेश, तर मोठ्या रक्कम देताना शेतकऱ्यांच्या नावावरील जमीन स्वतःच्या किंवा दलालांच्या नावावर खूष खरेदी पद्धतीने करून घेत आहेत. याचा खर्चही शेतकऱ्यांना द्यावा लागतो. शेतकरी व्याजाच्या व इतर खर्चाच्या बोजामुळे अडचणीत सापडू लागला आहेत.

जंक्‍शन परिसरात दहशत
लासुर्णे, बोरी व जंक्‍शन परिसरात अनेक मोठे खासगी सावकार असून, या सावकरांची दहशत आहे. चौकामध्ये बसून शेतकरी व व्यापाऱ्यांना दमदाटी करण्याचे प्रकार घडत असतात. तसेच अनेक सावकार दुकानदारांच्या दुकानापुढे सकाळी सातपासून ठाण मांडून बसतात.

तिघांनी सोडले गाव
इंदापूर तालुक्‍यातील लासुर्णे गावातील तिघे जण दोन वर्षांमध्ये खासगी सावकारीच्या जाचाला कंटाळून घर-दार सोडून गावातून निघून गेले आहेत. तसेच, अनेक सावकार विनयभंगही करीत आहेत. बोरीमध्ये असाच एक प्रकार घडल्यानंतर ते प्रकरण आपापासात मिटविण्यात आल्याची चर्चा आहे.

खासगी सावकारांकडून त्रास होत असल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा.
- अरविंद काटे, सहायक पोलिस निरीक्षक, वालचंदनगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT