पुणे

तरुणी, महिलांसाठी उद्या ‘फॅशन शो’

सकाळवृत्तसेवा

पुणे  - कपड्यांच्या असंख्य स्टाइल्सने भुरळ पाडणारा ब्रॅंड ‘मॅक्‍स फॅशन’ व ‘सकाळ माध्यम समूहा’ने शनिवारी (ता. १) १८ ते ३५ वयोगटातील महिलांसाठी ‘फॅशन शो २०१८’ आयोजित केला आहे. स्वारगेट परिसरातील कुमार पॅसेफिक मॉल येथे होणाऱ्या या शोमध्ये सकाळी ऑडिशन (प्राथमिक फेरी) व सायंकाळी अंतिम फेरी होणार आहे.

नटण्या मुरडण्याची, वेगवेगळ्या ब्रॅंडचे कपडे घालण्याची, फॅशन शो पाहताना एकदा तरी रॅम्प वॉक करण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांनाच या फॅशन शोच्या निमित्ताने इच्छापूर्तीची संधी मिळणार आहे. फॅशन शोसाठी १८ ते २५ वर्षे  व २६ ते ३५ वर्षे असे दोन गट करण्यात आले आहेत. डेनिम राउंड, एथनिक (पारंपरिक पोशाख) व प्रश्‍न उत्तरे अशा तीन फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा रंगणार असून, ऑडिशनसाठी स्पर्धकाचा आत्मविश्‍वास व सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा विचार करण्यात येणार आहे. अंतिम फेरीसाठी निवडलेल्या स्पर्धकांना फॅशन क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. स्पर्धकांनी अंतिम फेरीसाठी लागणारा पोषाखही सोबत ठेवणे गरजेचे आहे. या स्पर्धेत दोन्ही गटांमधून प्रत्येकी दोन असे एकूण चार विजेते घोषित करण्यात येणार आहेत. 

काय -  फॅशन शो २०१८ 
कोठे - कुमार पॅसेफिक मॉल, स्वारगेट 
कधी - शनिवार, ता. १
केव्हा -  ऑडिशन - सकाळी ११ ते दुपारी १ व अंतिम फेरी - सायंकाळी ६ ते ८
अधिक माहितीसाठी संपर्क - ८८०५००९३९५ किंवा ९५५२५३३७१३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : दोघांची नजर प्लेऑफच्या तिकीटावर... पण चेन्नई घेणार पंजाबकडून मागील पराभवाचा बदला

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

SCROLL FOR NEXT