Brittany Lauga
Brittany LaugaEsakal

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

Australian MP: व्यवसायाने शहर नियोजक असलेल्या 37 वर्षीय ब्रिटनी लॉगा सुमारे एक दशकापासून संसदेत आहेत. 2015 मध्ये केपलच्या जागेवर पहिल्यांदा निवडून आल्या होत्या.

ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड येथील एका महिला खासदाराने आपला लैंगिक छळ झाल्याचा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, तिला अंमली पदार्थांचे सेवन करायला लावले होते.

ब्रिटनी लॉगा नावाची खासदार ऑस्ट्रेलियात सहाय्यक आरोग्य मंत्री आहे. एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये त्यांनी सांगितले की, एका संध्याकाळी त्यांच्या मतदार संघ येप्पूनमध्येही त्यांच्यावर हल्ला झाला. त्या म्हणाल्या, "हे कोणाच्याही बाबतीत घडू शकते आणि दुःखाची गोष्ट म्हणजे आपल्यापैकी अनेकांसोबत असे घडते." (Brittany Lauga Australian MP)

37 वर्षीय ऑस्ट्रेलियन खासदाराने 28 एप्रिल रोजी लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करून पोलिसांकडे धाव घेतली होती. यानंतर ती रुग्णालयातही गेली.

टेलिग्राफच्या रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियन पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 37 वर्षीय ऑस्ट्रेलियन खासदार 28 एप्रिल रोजी पोलिसांकडे गेली आणि नंतर रुग्णालयात दाखल झाली.

टेलीग्राफच्या रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियन पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये केलेल्या चाचण्यांमधून तिच्या शरीरात ड्रग्ज असल्याची पुष्टी झाली आहे. तिने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये याबाबतचा खुलासा केला आहे.

Brittany Lauga
Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

क्वीन्सलँड पोलिसांनी टेलिग्राफला सांगितले की ते येप्पूनमधील एका घटनेशी संबंधित लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीची चौकशी करत आहेत. पोलिसांनी सांगितले की त्याच भागात इतर कोणतेही अहवाल आलेले नाहीत, परंतु कोणासही माहिती असल्यास त्यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले जात आहे.

ऑस्ट्रेलियन मीडियाने वृत्त दिले आहे की, क्वीन्सलँड गृहनिर्माण मंत्री मेघन स्कॅनलॉन यांनी आरोपांचे वर्णन "धक्कादायक आणि भयानक" म्हणून केले आहे, "ब्रिटनी क्वीन्सलँड संसदेतील एक सहकारी आणि मैत्रिण आहे. तिच्यासोबत जे घडले ते खरोखरच धक्कादायक आहे," असे स्कॅनलॉन म्हणाले.

Brittany Lauga
S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

कोण आहेत ब्रिटनी लॉगा?

व्यवसायाने शहर नियोजक असलेल्या 37 वर्षीय ब्रिटनी लॉगा सुमारे एक दशकापासून संसदेत आहेत. 2015 मध्ये केपलच्या जागेवर पहिल्यांदा निवडून आल्या होत्या.

ब्रिटनी लॉगा यांच्याकडे आरोग्य आणि प्रादेशिक आरोग्य पायाभूत सुविधांसाठी सहाय्यक मंत्रीपद आहे, असे वृत्त द गार्डियनने दिले आहे. .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com