फर्ग्युसन महाविद्यालय - स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेत असताना सावरकर वसतिगृहामध्ये वास्तव्यास असलेली खोली सर्वांसाठी खुली करण्यात आली होती. या खोलीतील सावरकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना विद्यार्थी
फर्ग्युसन महाविद्यालय - स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेत असताना सावरकर वसतिगृहामध्ये वास्तव्यास असलेली खोली सर्वांसाठी खुली करण्यात आली होती. या खोलीतील सावरकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना विद्यार्थी 
पुणे

सावरकरांची खोली पाहून नागरिक भारावले (व्हिडिओ)

सकाळवृत्तसेवा

पुणे - स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे पुण्यातील वास्तव्य असलेली खोली, त्यातील वस्तू, साहित्य उत्सुकतेने न्याहळणारी लहान मुले, त्याबाबत जाणून घेणारे तरुण आणि ज्येष्ठ नागरिक असे चित्र फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतगृहामधील खोली क्रमांक १७ मध्ये पाहायला मिळाले.

सावरकर हे महाविद्यालयामध्ये शिक्षण घेताना महाविद्यालयातील वसतिगृहाच्या या खोलीत वास्तव्यास होते.त्यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालय प्रशासनाने ही खोली सर्वांसाठी खुली केली होती.

महाविद्यालयामध्ये सावरकर यांची जयंती मंगळवारी सकाळी साजरी करण्यात आली. वसतिगृहाच्या आवारात झालेल्या कार्यक्रमामध्ये डेक्‍कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. या वेळी ‘सावरकरांचे कार्य कर्तृत्व’ या विषयावर ॲड. नितीन आपटे यांचे व्याख्यान झाले. तसेच हेमंतराजे मावळे यांनी त्यांच्या विद्यार्थी सहकाऱ्यांसह सावरकर यांनी रचलेला पोवाडा सादर केला.

सावरकर या खोलीमध्ये १९०२ ते १९०५ या कालावधीमध्ये वास्तव्यास होते. खोलीत त्यांच्या आयुष्याशी जोडलेल्या काही वस्तू ठेवलेल्या आहेत. खोलीच्या भिंतीवर सावरकरांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांची माहिती दिलेली आहे. डॉ. कुंटे यांनी खोलीविषयी माहिती देताना म्हणाले, ‘‘सावरकर यांनी अभिनव भारत संस्थेचे संघटन या खोलीतून केले. तसेच विद्यार्थांना ब्रिटिशांच्या विरोधात एकत्र करण्याला ही खोली साक्ष आहे. सावरकरांनी विदेशी कपड्यांची होळी याच काळात केली होती. सावरकरांनी जे महान कार्य केले त्याचा पाया या खोलीत घातला गेल्याचेही त्यांनी सांगितले.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT