पुणे

भाऊंना पोस्टल मतदानाने आणले बरोबरीला पण...

दत्ता जाधव

माळशिरस : माणसाच्या प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी त्याच्या प्रमाणिक प्रयत्न व कष्ट बरोबरच त्याला जोड लागते नशिबाची असे म्हटले जाते. याचा प्रत्यय ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान पुरंदर तालुक्यातील आंबळे येथील उमेदवारांना आला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

येथील ग्रामपंचायत निवडणुकीत तीन प्रभागांमध्ये असणाऱ्या नऊ जागांसाठी वॉर्डनिहाय समविचारी आघाडी तयार होऊन परस्पर विरोधी उमेदवार लढल्याने निवडणुकीचा निकालही त्याच पद्धतीने लागला. मात्र खरी रंगत पाहायला मिळाली ती वार्ड क्रमांक दोनमधील एका सर्वसाधारण जागेवरती.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीची अखेर चिठ्ठीद्वारे नशिबाने दिलेल्या साथीची पुरंदर तालुक्यात संपूर्ण चर्चा ऐकावयास मिळाली. वार्ड दोनमध्ये सर्वसाधारण जागेवरती अजित दिलीप जगताप व नंदकुमार बाबासो दरेकर यांच्यामध्ये थेट लढत झाली. मतदान मशिनद्वारे झालेल्या मतमोजणीत अजित जगताप यांना 270 मते व नंदकुमार दरेकर यांना 267 मते मिळाली. यामुळे अजित जगताप विजयाच्या वाटेवरती असताना पाच पोस्टल मतदान या वार्डातील आले. यामुळे या पोस्ट मतदानाकडे सर्व उपस्थित प्रतिनिधींचे लक्ष लागलेले असताना अजित जगताप यांना त्यातील एक मतदान मिळाले तर नंदकुमार दरेकर यांना चार मते मिळाल्याने दोन्ही उमेदवारांना 271 अशी समान मते झाली.

यामुळे उपस्थित मतमोजणी अधिकाऱ्यांना अखेर या दोन उमेदवारांची चिठ्ठी टाकावी लागली. यामध्ये मतदान पेटीतील मतदानावर आघाडीवर असणारे अजित जगताप यांची चिठ्ठी निघाल्याने त्यांचा विजय निवडणूक मतदान अधिकाऱ्यांनी घोषित केला. यामुळे अजित जगताप यांना नशिबाने दिलेल्या साथीची आंबळे गावासह तालुकाभर चर्चा ऐकावयास मिळाली .

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT