crime.jpg
crime.jpg 
पुणे

आम्हाला घाबरत नाही का? म्हणत येरवड्यात दोन गटात राडा

सकाल वृत्तसेवा

पुणे : 'रस्त्याने जाताना तु आम्हाला घाबरत नाहीस का?' असा जाब विचारल्याने दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात तिघांवर कोयता आणि लोखंडी गजाने हल्ला केला. एकाची प्रकृती गंभीर अाहे. ही घटना येरवडा येथील आशापुरा स्टोअर समोर मंगळवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी दोन्ही गटातील ९ जणांना अटक केली आहे. 

रमाशंकर हिरालाल जैस्वाल (वय.18,रा. येरवडा) याने दिलेल्या फिर्यादीवरुन विजय रमेश राठोड(वय 24), रोहित राम कांबळे(वय 19), सागर संतोष माने(वय 19),अमित सुरेश गायकवाड(वय 19), गणेश शिवाजी पाटील(वय 24), साहिल संतोष सोनवणे(सर्व रा. येरवडा) यांना अटक केली आहे. तर, विजय रमेश राठोड (वय 24,सर्व रा. येरवडा) याने दिलेल्या फिर्यादीनुसार ओमकार युवराज सोनवणे(वय 20),प्रज्वल बापु कदम(वय 19),आशिष अशोक परदेशी(वय 21),राजवीरसिंग रणजितसिंग सहोगा(वय 19, रा. सर्वजन रामनगर येरवडा) या चौघांना अटक केली आहे. तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमाशंकर हा त्याच्या मित्रासोबत गप्पा मारत थांबला असताना. यावेळी आरोपी तीन दुचाकीवरुन आरडा-ओरडा करत त्या ठिकाणी आले. त्यानंतर हातामध्ये कोयते फिरवत दहशत निर्माण केली. यानंतर फिर्यादी व त्याच्या मित्राला तुम्हाला माज आला आहे का? आम्हाला बघुन सुध्दा तुम्ही का थांबलात? आमची भिती वाटत नाही का? असे म्हणत यांची आज येथे विकेटच टाकू असे म्हणत त्यांच्यावर हल्ला केला. 

राठोड यांटने दिलेल्या फिर्यादीनुसार, ते  त्यांच्या मित्रासोबत रहात्या घरासमोर उभे असताना मनोज  जैस्वाल हा गल्लीतून वेगाने दुचाकी घेऊन सारखे हेलपाटे मारत होता. त्यावेळी त्याला गाडी हळू चालव असे सांगितले. याच  राग आल्याने आरोपीने त्याच्या  साथीदारांना सोबत घेऊन कोयता व गज घेऊन परिसरात दहशत पसरवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीचा मित्र मित्र रोहित कांबळे व सागर माने यांना शिवीगाळ करुन लोखंडी गजाने मारहाण करुन जखमी केले.  पुढील तपास उपनिरीक्षक भांगे करीत  आहेत.

अटक करण्यात आलेले आरोपी हे एकाच ग्रुपमधील असून, काही कारणातून त्यांचा एकमेकांमध्ये वाद झाला होता. मंगळवारी रात्री याच वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यामध्ये दहा जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये  दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. यापैकी तिघे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत, असे वरिष्ठ निरीक्षक  युनूस शेख यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT