Firing
Firing 
पुणे

भावाचा जीव वाचविण्यासाठी हवेत गोळीबार

सकाळवृत्तसेवा

पुणे - मोटारीसमोर आलेल्या दुचाकीस्वारास थांबण्यास सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या दुचाकीस्वाराने त्याच्या साथीदारासह चालकास जबर मारहाण केली. दरम्यान, मोटारचालकाला वाचविण्यासाठी त्याच्या चुलत भावाने त्याच्याकडील पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. कोंढवा परिसरात शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता ही घटना घडली.

सुफियान रफीक खान (वय ३३, रा. कौसरबाग, कोंढवा), उबेद सईद खान (वय ३०, रा.  रविवार पेठ), अब्दुल रजा शेख (वय २८, रा. क्‍लाऊड नाईन सोसायटी, कोंढवा), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अब्दुला दुराज गोरे ( वय १९, रा. कोंढवा खुर्द) यांनी कोंढवा ठाण्यात 
फिर्याद दिली. 

पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरे हे शुक्रवारी मोटारीतून जात होते. कोणार्क सोसायटीजवळ वळणावर त्यांच्यासमोर दुचाकीस्वार आला. त्यास थांबण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने त्याने दुचाकीवरून उतरुन फिर्यादी यांना हेल्मेटने मारहाण करण्यास सुरवात केली. त्यानंतर दुचाकीस्वाराने त्याच्या दोन साथीदारांना बोलावले. 

फिर्यादी यांना लोखंडी बारने मारण्यास सुरवात केली. त्या वेळी फिर्यादी जीव वाचविण्यासाठी जवळच राहणाऱ्या त्यांचा चुलत भाऊ हसन समीर गोरे याच्या सोसायटीत गेले. तेव्हा हसन गोरे यांनी तिघांना समजाविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही तिघांनी अब्दुर गोरे यांना मारहाण सुरूच ठेवली. 
दरम्यान, हसन गोरे यांनी मारहाण करणाऱ्या आरोपींना रोखण्यासाठी पिस्तूल काढले. परंतु, आरोपींनी त्यांचे ऐकले नाही. भावाचा जीव वाचविण्यासाठी त्यांनी हवेत गोळीबार केला. त्यानंतर तिन्ही आरोपी पळून गेले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT