pimpri
pimpri 
पुणे

पिंपरी : वाकडमध्ये मोटार चालकांवर गोळीबार 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी (पुणे) : सिगारेट घेण्यासाठी उतरलेल्या वाहन चालकांवर तीन जणांनी गोळीबार केला. ही घटना वाकड येथे शनिवारी रात्री साडेअकरा वाजता घडली.

हरिओम मेहरसिंग सिंग (वय ३० रा. रा. सुतारवाडी, पाषाण. मुळगाव राजस्थान) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास मुंबई बेंगलोर महामार्गावरील वाकड येथील हॉटेल कोल्हापुरी येथे पानटपरीवर सिगारेट घेण्यासाठी थांबले होते. त्यावेळी तिघेजण त्यांच्या मोटारीत येऊन बसले. 

हरिओम हे सिगारेट घेऊन पुन्हा मोटारीत आले असता आरोपींनी फिर्यादी यांच्या पोटाला पिस्तूल लावले आणि मोटार पुढे घेण्यास सांगितले. त्यावेळी फिर्यादी हरिओम यांनी 'काय झाले?' अशी विचारणा आरोपींना केली. त्यापैकी एकाने 'तुला मारायचे आहे काय,' असे म्हटले. यामुळे घाबरलेल्या हरिओम यांनी मोटारीतून उतरून हॉटेलच्या दिशेने पळ काढला. त्यावेळी एका आरोपीने हरिओम यांच्यावर गोळीबार केला. 

या गोळीबारात हरिओम यांच्या पायाला गोळी लागून ते जखमी झाले. गोळीबारानंतर हल्लेखोर पळून गेले. माहिती मिळताच वाकड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आरोपींच्या शोधासाठी वाकड पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT