fisherman died of electric shock after leaving electric current in water pune
fisherman died of electric shock after leaving electric current in water pune sakal
पुणे

Pune : विजेचा करंट पाण्यात सोडून मासेमारी करणाऱ्यालाच विजेचा शॉक बसुन मृत्यु

सुदाम बिडकर ः सकाळ वृत्तसेवा

पारगाव : टाव्हरेवाडी ता. आंबेगाव येथे बंधाऱ्याच्या पाण्यात विजेचा करंट सोडून मासेमारी करणाऱ्या प्रकाश भिमाजी मधे (वय ५० वर्ष) मुळ गाव वडगाव काशिंबेग यांनाच विजेचा शॉक बसुन पाण्यातच मृत्यू झाला आहे.

सविता प्रकाश मधे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सविता मधे व त्यांचे पती प्रकाश मधे मुलगी सोनाली यांच्यासह सुमारे ४० वर्षापासून टाव्हरेवाडी येथील उत्तम तुकाराम टाव्हरे यांच्याकडे शेतमजुर म्हणुन कामास आहे ते नेहमी येथील ओढ्यावर असलेल्या बंधाऱ्यातील पाण्यात मासेमारी करण्यासाठी साठी जात असतात मासेमारी करण्यासाठी ते बंधाऱ्याच्या जवळच असलेल्या लाईटच्या डीपी वरून वायर जोडून त्या वायरमधुन येणारा विजेचा करंट पाण्यात सोडून त्याव्दारे मासे बेशुध्द करून मासेमारी करतात.

आज रविवारी सकाळी आठ वाजता प्रकाश मधे बंधाऱ्याच्या पाण्यात पडलेल्या अवस्थेत ग्रामस्थांना आढळुन आले असून त्यांच्या जवळ काळ्या रंगाची वायर व ती वायर लाईटच्या डीपीला जोडलेली दिसली उत्तम तुकाराम टाव्हरे व ग्रामस्थांनी ती वायर डीपीतुन काढुन प्रकाश मधे यांना पाण्याच्या बाहेर काढून मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून औषध उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले यावरून मंचर पोलिसांनी आकस्मित मयत गुन्हा दाखल केला आहे पाण्यात विजेची वायर सापडल्याने विजेचा शॉक बसूनच मृत्यू झाला असल्याचे अंदाज व्यक्त केला जात आहे .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT