arrested.jpg
arrested.jpg 
पुणे

लूटमारप्रकरणी रावण टोळीतील पाच जणांना अटक    

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : बनावट पिस्तुल व कोयत्याचा धाक दाखवून ट्रकचालकाकडील ऐवज लुटून पसार झालेल्या रावण टोळीतील पाच जणांना निगडी पोलिसांनी अटक केली. 

अविनाश दिलीप शेलार (वय 19, रा. मोरया कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड), स्वप्नील उर्फ बबलु शिवाजी वाघमारे (वय 22, रा. भोंडवेवस्ती, ओमसाई कॉलनी, चिंचवड), नरेश शंकर चव्हाण (वय 19, रा. जिजामाता चौक, वाल्हेकरवाडी, चिंचवड), सुर्यकांत सुनिल फुले (वय 19, रा. भोंडवेवस्ती, चिंचवड), किरण शिवाजी खवळे (वय 20, रा. भिमाई हौसिंग सोसायटी, ओटास्किम, निगडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर एक अल्पवयीन ताब्यात आहे.

11 ऑगस्टला (रविवार) निगडीतील ट्रान्सपोर्टनगर येथे ट्रकचालक अवतार मेजर सिंग मुक्कामी थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या आरोपींनी सिंग यांना कोयत्याने बेदम मारहाण करीत त्यांच्याकडील ऐवज लुटला. तसेच त्यांच्या इतर सहकाऱ्यांनाही कोयत्याचा धाक दाखवून दमदाटी केली. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दरम्यान, यातील आरोपी रावण टोळीचे असल्याची माहिती मिळाली.

पोलिस आरोपींचा शोध घेत असताना आकुर्डी रेल्वेस्थानकासमोरील रस्त्यावरुन दोघेजण दुचाकीवरुन संशयितरित्या दिसून आले. त्यांना पकडून कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर इतर आरोपींची नावे समोर आली. तपासात हे आरोपी बनावट पिस्तुलचा व कोयत्याचा धाक दाखवून गुन्हे करीत असल्याचे स्पष्ट झाले. आरोपींकडून दोन दुचाकी, एक बनावट पिस्तुल, तीन कोयते व तेराशे रुपयांची रोकड असा 42 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला. पाच आरोपींना अटक केली असून त्यांना 18 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर एका अल्पवयीन मुलगा ताब्यात घेतले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT