Madhuri-Misal
Madhuri-Misal 
पुणे

तातडीने फ्लेक्‍स काढा - माधुरी मिसाळ

सकाळ वृत्तसेवा

पुणे - 'महाजनादेश' यात्रेच्या स्वागतासाठी फ्लेक्‍स उभारून शहराच्या विद्रूपीकरणाबद्दल मुख्यमंत्र्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर जागे झालेल्या शहर भाजपच्या नेत्यांना फ्लेक्‍स काढून घेण्यासाठी सोमवारी रात्रीची मुदत दिली. "तातडीने फ्लेक्‍स काढा; अन्यथा मी उद्या स्वत: फिरून ते काढीन,' अशा शब्दांत शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांनी पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.

मुख्यमंत्र्यांची "महाजनादेश' यात्रा शनिवारी पुण्यात दाखल झाली. या यात्रेच्या स्वागतासाठी दोन दिवस आधीपासून संपूर्ण शहरात भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक, आमदार आणि इच्छुकांनी मोठ्या प्रमाणावर फ्लेक्‍स लावले होते. एवढेच नव्हे, तर फ्लेक्‍स लावण्यावरून नेत्यांमध्ये वादावादीही झाली होती. त्यातच एरंडवणा येथे एका आमदारांच्या फ्लेक्‍समुळे ऍम्ब्युलन्सदेखील जाऊ न शकली नाही, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी विचारले असताना, त्यांनीदेखील जाहीर नाराजी व्यक्‍त केली होती.

दरम्यान, सोमवारी शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या नाराजीचे पडसाद उमटले. शहराध्यक्ष मिसाळ यांनी "मुख्यमंत्र्यांनी आणि मी सांगूनदेखील मोठ्या प्रमाणावर अजूनही फ्लेक्‍स तसेच आहेत. त्यामुळे ज्यांनी फ्लेक्‍स लावले आहेत त्यांनी सोमवारी रात्रीपर्यंत ते काढून घ्यावेत. तुम्हाला जमत नसेल, तर मला सांगा. उद्या मी स्वत: फिरून ते काढून घेते,' अशा शब्दांत कानउघाडणी केली. मुख्यमंत्री आणि शहराध्यक्षांनी सांगितल्यानंतर तरी पदाधिकारी फ्लेक्‍स काढून घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकली; मुंबईसाठी करो या मरो सामना

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT