for migration independent ministry needed shekhar deshmukh
for migration independent ministry needed shekhar deshmukh Sakal
पुणे

Pune News : स्थलांतरितासाठीच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र मंत्रालयाची गरज; शेखर देशमुख

सकाळ वृत्तसेवा

Pune News : ‘‘भारतातील स्थलांतरीत नागरिकांचे प्रश्न हा अत्यंत कळीचा मुद्दा असल्याचे कोरोना काळात प्रकर्षाने जाणवले. त्यातही उत्तर प्रदेश आणि बिहार येथील स्थलांतरित नागरिकांचे प्रमाण अधिक दिसून येते. स्थालांतरित नागरिकांचे प्रमाण, आरोग्य, गरजा याचे सर्वेक्षण होणे गरजेचे आहे.

स्थलांतरित नागरिकांचे प्रश्न आणि गरजा समजून घेण्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाची गरज आहे,’’ असे मत लेखक व पत्रकार शेखर देशमुख यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरप्रणाली अभ्यास केंद्र यांच्यातर्फे (सामाजिक शास्त्रे आणि मानव्यविद्या) आयोजित डॉ. अनंत आणि लता लाभसेटवार व्याख्यानमालेत देशमुख बोलत होते.

‘सक्तीचे स्थलांतर आणि कोंडीग्रस्त स्थलांतरीत : सामाजिक-आरोग्यविषयक तुटलेपणाचे वर्तमान वास्तव’ विषयावर त्यांनी विचार मांडले.  याशिवाय स्थलांतरितांचे मानसिक आरोग्य आणि शहरी रोजगार हमी योजनेची गरज असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आंतरप्रणाली अभ्यास केंद्राच्या प्रमुख डॉ. राजेश्वरी देशपांडे यांनी केले. व्याख्यानमालेत विद्यापाठातील विविध विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

SCROLL FOR NEXT