pune.jpg
pune.jpg 
पुणे

शेतकऱ्यांकडून दहा हजाराची लाच घेणाऱ्या वनपालास अटक  

प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) : खोरवडी (ता. दौंड) येथील एका शेतकऱ्यास शस्त्र परवान्यासाठी `ना हरकत दाखला` देण्याकरिता दहा हजाराची लाच स्विकारताना वनपाल समाधान पाटील यास पकडण्यात आले आहे. दौंड शहरात आज (ता. ३१) दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली.

खोरवडी येथील एका शेतकऱ्यास शस्त्र परवान्यासाठी वन विभागाकडून राहत्या घरापासून दहा किलोमीटर अंतरावर अभयारण्य नसल्याबाबतचा `ना हरकत दाखला` दाखला घ्यावयाचा होता. संबंधित शेतकऱ्याने दौंड येथील वन विभागाच्या कार्यालयात चार महिन्यापूर्वी रितसर अर्ज केला .परंतु अधिकाऱ्यांनी टाळाटाळ करीत त्यास हेलपाटे मारावयास लावले. वनपाल समाधान मारूती पाटील (वय ३४, सध्या रा. दौंड) याने सदर दाखल्यासाठी वीस हजार रूपयांची मागणी केली व तडजोडीनंतर दहा हजार रूपयांची रक्कम ठरविण्यात आली. 

 दरम्यान संबंधित शेतकऱ्याने पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात संपर्क साधल्यावर सापळा रचण्यात आला. सापळ्यानुसार आज दुपारी बोरावकेनगर येथील एका हॅाटेलमध्ये दहा हजार रूपये स्वीकारताना समाधान पाटील यास पकडण्यात आले. या लाच प्रकरणात वन विभागाच्या आणखी काही अधिकारी व कर्मचार्यांच्या सहभाग असण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने तपास केला जात आहे.
नागरिकांनी शासकीय अधिकारी व कर्मचाऱयांनी लाचेची मागणी केल्यास तक्रारीसाठी १०६४ या टोल फ्री हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे. 

मंत्र्याला सांगितले तरी देत नाही....
दाखल्यासाठी वारंवार विनवणी केली तरी वनपाल समाधान पाटील याने `मंत्र्याला सांगितले तरी दाखला देत नाही`, असे उद्दामपणे सांगितले होते, अशी माहिती संबंधित शेतकऱ्यांने दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT