Leopard
Leopard Sakal
पुणे

Leopard : जुन्नरला नागरी वस्तीतील चौथा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

दत्ता म्हसकर

जुन्नर शहर परिसरात नागरी वस्तीत संचार करणारा चौथा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले.

जुन्नर - जुन्नर शहर परिसरात नागरी वस्तीत संचार करणारा चौथा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे, अशी माहिती वनक्षेत्रपाल अजित शिंदे यांनी दिली.

शहरातील लोकवस्तीच्या भागात भर दिवसा देखील वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जुन्नर शहरातील आगरपेठ येथे दीड महिन्यात एकाच ठिकाणी तीन बिबटे जेरबंद करण्यात आले होते. त्यानंतर कल्याण पेठेतील नागरी वस्तीतील हा चौथा बिबटया जेरबंद झाला आहे.

कल्याण पेठेतील शिंदे यांचे शेत व नाल्याच्या झुडुपात बिबटया असल्याच्या तक्रारी परिसरातील नागरिकांनी केल्या होत्या. भर दिवसा बिबटया शेतात फिरत असताना दिसत होता. तर रात्रीच्या वेळी बिबट्याच्या डरकाळ्या कानी पडत होत्या. यामुळे वनविभागाने शनिवारी ता. २४ रोजी लावलेल्या पिंजऱ्यात आज रविवार ता. २५ रोजी बिबट्या जेरबंद झाला. पिंजरा लावल्यानंतर लगेचच बिबट्या त्यात अडकल्याने नागरिक व वनविभागाने सुटकेचा निश्वास टाकला.

जुन्नरचे वनपरिमंडळ अधिकारी नितीन विधाटे, वनरक्षक नारायण राठोड, संजय गायकवाड, स्वरूप रेगडे, तेजस्वीनी भालेकर, वनमजुर दादु जाधव, सतोष भालेकर, पंढरीनाथ भालेकर यांचे बिबट्या जेरबंद करण्याचे कामी सहकार्य झाले. पिंजऱ्यात सापडलेला नर बिबट्या दहा वर्षे वयाचा आहे. त्यास माणिकडोह निवारा केंद्रात पाठविण्यात आले असल्याचे वनपाल विधाटे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

SCROLL FOR NEXT