pcmc
pcmc 
पुणे

गहुंजे, शिवण्यात बंधारे

ज्ञानेश्वर बिजले

पिंपरी - पिंपरीकरांच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने सध्या रखडलेला पवना जलवाहिनी प्रकल्प महत्त्वाचा असून, त्यासाठी गहुंजे आणि शिवणे येथे कोल्हापूर पद्धतीने बंधारे बांधून देण्याचा आदेश महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने पालिकेला २०१२ मध्ये दिला होता. त्या बंधाऱ्यांच्या कामाला जलसंपदा विभागाने तांत्रिक मान्यता दिली आहे. यासाठी १८ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

महापालिकेतर्फे पवना धरणापासून निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्याच्याविरोधात भारतीय किसान संघाने जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना प्राधिकरणाने गहुंजे व शिवणे येथे महापालिकेने बंधारे बांधून देण्याचा आदेश दिला. जलसंपदा विभागाकडून या बंधाऱ्यांचा तांत्रिक आराखडाकडून त्याच्या खर्चाची रक्कम निश्‍चित करण्यात आली.

त्यासंदर्भातील सूचना जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयाकडून पवना धरणाच्या कार्यालयाकडे डिसेंबरमध्ये पाठविण्यात आल्या. गहुंजे येथील बंधाऱ्यासाठी दहा कोटी ७३ लाख रुपये आणि शिवणे येथील बंधाऱ्यासाठी सहा कोटी ४७ लाख रुपये खर्च येणार आहे. 

याबाबत पवना धरणाचे उपअभियंता अशोक शेटे म्हणाले, ‘‘गहुंजे येथे स्मशानभूमीजवळ पवना नदीमध्ये ५.७ मीटर उंचीचा बंधारा बांधण्यात येईल. गहुंजे व साळुंब्रे गावांतील शेतीच्या सिंचनासाठी या बंधाऱ्यापासून पाणी पुरविता येईल.’’

जलसंपदा विभागातर्फे या कामाच्या निविदा काढण्यात येतील. दोन्ही बंधाऱ्यांच्या कामासाठी १८ ते २० कोटी रुपये खर्च होतील. प्रकल्पाचा फायदा चार गावांतील सिंचनासाठी होईल. 
- संजीव चोपडे, अधीक्षक अभियंता, जलसंपदा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT