Crime
Crime 
पुणे

'गॅलॅक्‍सी' आर्थिक गैरव्यवहार; मुख्य संशयितांना लखनौमधून अटक

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महाराष्ट्रासह देशातील चार राज्यांमध्ये जादा व्याजाचे आमिष दाखवून लोकांकडून कोट्यवधी रुपये उकळून केलेल्या आर्थिक गैरव्यवहारातील गॅलॅक्‍सी ग्रुप ऑफ कंपनीजच्या दोन मुख्य संचालकांना राज्य गुन्हे अन्वेषण विभाग व उत्तर प्रदेश दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) संयुक्त कारवाई करून लखनौमधून अटक केली. हे संशयित तब्बल वीस वर्षांपासून फरारी होते. गुन्हे अन्वेषण पथकाने त्यांच्याकडून चार कोटी 86 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

सतीशचंद्र भगवतीप्रसाद मिश्रा (वय 65), रामकृष्ण प्रेमचंद दुबे (वय 58, दोघेही रा. संत कबीरनगर, लखनौ, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणी यापूर्वी प्रमोदकुमार गंगा पांडे, अमोदकुमार पांडे, घनश्‍याम कालिप्रसाद पांडे, मैफतुल्लाखान अब्दुलमजीद खान, रहेफिरदौस अफताब अहमद सिद्दीकी, सतेंद्र वसिष्ठ त्रिपाठी या आरोपींना अटक केली आहे.

अशी केली फसवणूक !
मिश्रा व दुबे यांनी महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये गॅलॅक्‍सी ग्रुप ऑफ कंपनीज्‌ची 1999 मध्ये स्थापना केली होती. त्याअंतर्गत त्यांनी आणखी पाच उपकंपन्यांची स्थापना केली. या कंपन्यांमार्फत जादा व्याजाचे आमिष दाखवून लोकांकडून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी स्वीकारल्या. तसेच ठेवीदारांना कोणत्याही प्रकारची रक्कम परत न करता 1999 मध्ये सात कोटी आठ लाख रुपयांचा अपहार केला व कंपनी बंद करून आरोपींनी महाराष्ट्रातून पळ काढला होता. संबंधित कंपनीच्या महाराष्ट्रात तब्बल 102 शाखा होत्या, त्यामुळे या कंपनीविरुद्ध महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये आर्थिक फसवणुकीचे 26 गुन्हे दाखल झाले होते.

असा लागला तपास !
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपासामध्ये संशयितांच्या पाचही कंपन्या रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडे गैर बॅंकिंग कंपन्या (एनबीएफसी) म्हणून नोंदणीकृत नसल्याचे व कंपनीला ठेवी जमा करण्याचे कोणतेही अधिकार नसल्याचे निष्पन्न झाले होते. दरम्यान, अतुलचंद्र कुलकर्णी यांनी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अपर पोलिस महासंचालकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गॅलॅक्‍सीच्या आर्थिक गैरव्यवहाराची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेश "एटीएस'चे अपर पोलिस महासंचालक असीम अरुण यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर उत्तर प्रदेश एटीएस व राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या भरारी पथकाने गेले चार दिवस लखनौ येथे तळ ठोकला होता. त्यानंतर सापळा रचून दोन्ही मुख्य संशयितांना अटक केली.

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेचे उपमहानिरीक्षक जालिंदर सुपेकर, पोलिस अधीक्षक (गुन्हे) पल्लवी बर्गे, अपर पोलिस अधिक्षक (भरारी पथक) नरेंद्र गायकवाड, पोलिस उपअधीक्षक विलास भोसले, पोलिस निरीक्षक भास्कर पुल्ली, यशवंत निकम, पोलिस कर्मचारी कृष्णकांत देसाई व दत्तात्रय भापकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

* एकूण फसवणूक - 7 कोटी, 8 लाख 49 हजार 226
* राज्ये - महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान
* गॅलॅक्‍सी कंपनीच्या महाराष्ट्रातील शाखा - 102
* महाराष्ट्रात संबंधित कंपनीविरुद्ध दाखल गुन्हे - 26
* महाराष्ट्रात येथे होत्या शाखा - वर्धा, नागपूर, अकोला, यवतमाळ, वाशीम, भंडारा, अमरावती, चंद्रपूर, बीड, लातूर, ठाणे, कोल्हापूर, रत्नागिरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT