PUne
PUne 
पुणे

Video : पुण्यात मानाच्या गणपतींचा नयनरम्य विसर्जन सोहळा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : अवघ्या राज्याचे आकर्षण असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवातील दिमाखदार विसर्जन मिरवणुकीला गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता उत्साहाच्या वातावरणात नयनरम्य सोहळ्याला प्रारंभ झाला. ढोल ताशांचा निनाद, बॅन्डचे सुरेल वादन आणि नागरिकांचा अलोट उत्साह, या वातावरणात मिरवणूक सुरू झाली. भाविकांचा प्रचंड प्रतिसाद हे या मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरले. 

पुण्यातील महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण झाल्यावर महापौर मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार अनंत गाडगीळ, तसेच विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मानाच्या गणपतींची आरती झाली. त्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला. मानाचा पहिला कसबा गणपतीच्या पुढे पाच पथके होती. पाठोपाठ मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्‍वरी गणपती, तिसरा गुरुजी तालीम मंडळाचा गणपती दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास बेलबाग चौकातून 'टिळक चौकाच्या दिशेने रवाना झाला.

मानाच्या गणेश मंडळांपुढे पोलिसांनी पाच पथकांना परवानगी दिली आहे. प्रत्येक पथकात 60 ढोल, 30 ताशे आणि 10 जणांचे ध्वजपथक असेल, असे सांगितले होते. त्याचे पालन पथकांनी केले. मिरवणूक सुरू झाली तेव्हा फारसे कडक उन नव्हते. आल्हाददायक वातावरण असल्यामुळे भाविकांचा, वादकांचा उत्साह दुणावला होता. परदेशी पर्यटकांचीही उपस्थिती लक्ष वेधून घेत होती.

पारंपरिक वेशभूषेतील महिला, कलावंतांचे पथक, कामायनीचे पथक, मैदानी खेळ खेळणाऱ्यां पथकांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत होता. पुण्यात यंदा सुमारे 3100 सार्वजनिक मंडळांची पोलिसांकडे नोंदणी झाली आहे. शहरातील लक्ष्मी रस्त, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता आणि केळकर रस्ता या चार विसर्जन मिरवणूक मार्गांवरून सुमारे 1200 मंडळे सहभागी होतील, असा अंदाज आहे. दोन मंडळांत फारसे अंतर पडू नये, यासाठी पोलिस सुरवातीपासूनच दक्षता घेताना दिसत होते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praful Patel : ''होय, 2004 पासून भाजपशी युती व्हावी म्हणून मी आग्रही होतो'', प्रफुल्ल पटेलांनी सगळाच इतिहास काढला

SRH vs PBKS Live Score : अभिषेक-क्लासेनची शानदार खेळी, हैदराबाद विजयासह प्लेऑफमध्ये; मात्र पंजाबची पराभवासह सांगता

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या मतदानापूर्वी दहशतवाद्यांचा हल्ला! भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू, तर एक दाम्पत्य जखमी

SCROLL FOR NEXT