Garbage 
 swach ATM
Garbage swach ATM sakal
पुणे

कचऱ्याच्या एटीएमचा चोरट्यांमुळे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

पुणे : स्वच्छ भारत अभियानाअंर्गत रस्त्यावर कचरा फेकण्यापेक्षा एटीएममध्ये कचरा टाका आणि पैसे मिळवा अशी योजना सुरू केली. त्यासाठी शहराच्या विविध भागात १० मशीन लावले. मात्र, या एटीएममध्ये खरेच पैसे असल्याचे चोरट्यांना वाटल्याने पैशासाठी तोडफोड करण्याचा आल्याचा प्रकार समोर आला आहे.

नागरिकांकडून प्लास्टिक, काचेच्या बाटल्या, धातूचे कॅन्स, प्लॅस्टिक रॅपर कुठेही फेकून दिल्या जातात. त्यामुळे शहर अस्वच्छ होत आहे. त्यापेक्षा नागरिकांनी हा कचरा महापालिकेने बसविलेल्या एटीएममध्ये टाकल्यास त्यातून नागरिकांना पैसे मिळतील अशी योजना आखण्यात आली. त्यासाठी इकोमक्स गो (इं) या स्टार्टअप कंपनीचे एटीएम बसविण्यास तीन महिन्यांपूर्वी स्थायी समितीने मान्यता दिली होती.

'पुनर्वापर होणारा कचरा या एटीएम मशिन्समध्ये संकलित केला जाणार आहे. या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी नागरिकांना संबंधित कंपनीचे ॲप डाऊनलोड करावे लागणार. त्यातून कोणत्या प्रकारचा कचरा टाकला जाणार हे सलेक्ट करायचे आणि कचरा टाकल्यानंतर त्याच्या वजनानुसार संबंधित नागरिकांच्या बँक खात्यात पुढील महिन्याभरात पैसे जमा होणार. यासाठी प्लॅस्टिकच्या एका बाटलीसाठी एक रुपया, काचेच्या बाटलीसाठी तीन रुपये, धातुच्या कॅनसाठी प्रत्येकी दोन रुपये आणि प्लॅस्टिक रॅपर्ससाठी प्रत्येकी वीस पैसे जमा होणार आहेत.

महापालिकेने पहिल्या टप्प्यात नोयडा येथून १० मशीन मागविल्या आहेत. या मशीन पुणे महापालिका, संभाजी उद्यान, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, राजीव गांधी उद्यान, मोरे विद्यालयाजवळ कोथरूड, एमआयटी महाविद्यालय कोथरूड, हायस्ट्रीट बाणेर, इआॅन आटी पार्क खराडी, नॉर्थ मेन रोड कोरेगाव पार्क आणि सारसबाग या ठिकाणी बसविण्यात आल्या आहेत. पण या मशीन बसवल्यानंतर त्या वापराच्या कशा यावरून नागरिकांचा गोंधळ निर्माण होत आहे. तसेच काही जणांना त्या मशीनमध्ये पैसे आहेत असा समज झाल्याने त्यांनी तोडफोन केली. त्यामुळे या मशीनमशील सेंसर खराब झाल्याने या एटीएमचा वापर बंद झाला आहे.

‘‘महापालिकेने १० ठिकाणी कचऱ्याचे एटीएम बसविले आहेत, पण त्यापैकी ६ मशीन खराब झालेल्या आहेत. यात पैसे असल्याचे समजून काहींनी त्याचे साहित्य तोडले आहे. या मशीन दुरूस्त केल्या जात आहेत. तसेच नागरिकांना याची माहिती होईपर्यंत एटीएम जवळ एक कर्मचारी संबंधित संस्थेतर्फे नियुक्त केला जाणार आहे. या मशीनमध्ये पैसे नाहीत, कचरा टाकल्यानंतर आॅनलाइन पैसे बँक खात्यात जमा होणार आहेत.’’

- अजित देशमुख, उपायुक्त,

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT