baba.JPG
baba.JPG 
पुणे

पाषाण - बावधन सेवा रस्त्यावर कचऱ्याचे ढीग 

सकाळ वृत्तसेवा

 
पुणे  ः पाषाण- बावधन सेवा रस्त्यावर साई मंदिर ते एचईएमआरएलपर्यंत मोठ्या प्रमाणात उघड्यावरच कचरा टाकला जात असल्याने दुर्गंधीसह परिसराचे विद्रुपीकरण होत आहे. येथे कचरा टाकणाऱ्यांवर महापालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाई करावी, अशी पर्यावरणप्रेमींसह सजग नागरिकांनी मागणी केली आहे. 

सेवा रस्त्यावरून ये-जा करणारे काही नागरिक घरातील कचरा तसेच हॉटेलमधील शिळे अन्न, भाजीपाला पिशवीत भरून सर्रास रस्त्याच्या कडेला टाकून देतात. यावर प्रशासनाने नियंत्रण आणून कचरा टाकणारांवर कडक कारवाई केली जावी, अशी मागणी केली जात आहे. आसपास मानवी वस्ती नसल्याने व अटकाव करणारे कोणी नसल्याने येथे दिवसाढवळ्या कचरा टाकला जात आहे. औंध क्षेत्रिय कार्यालय व कोथरूड क्षेत्रिय कार्यालयाच्या सीमेवर असलेल्या या भागात महापालिकेकडून कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासह कचरा निर्मूलनासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कचऱ्यामध्ये प्लॅस्टिक पिशव्या, शिळे व कुजलेले अन्नपदार्थ, रंगकाम व बांधकामाचे साहित्य आदींचा समावेश नियमित असतो. 
कुजलेल्या कचऱ्यामुळे वाहनचालकांना येथून मार्गक्रमण करताना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. येथील घाणीच्या साम्राज्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन परिसरात साथीचे आजार पसरू शकतात. त्यामुळे महापालिका प्रशासनाने येथे आवश्‍यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. 
""हा भाग महामार्गानजीक असून येथील कचरा उचलण्याची मोहीम नियमित राबवली जाते, परंतु ये-जा करणारे कचरा टाकून निघून जातात. नागरिकांनी सजग होणे गरजेचे आहे.'' - निखिल निकम, आरोग्य निरीक्षक, औंध क्षेत्रिय कार्यालय 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

SRH vs LSG IPL 2024 : प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी चढाओढ! सनरायझर्स हैदराबाद-लखनौ आज आमने-सामने

ST Bank: सदावर्ते दाम्पत्याच्या हातून एसटी बँक गेली! सहकार खात्याचा दणका

Latest Marathi News Live Update : सायना नेहवाल, राजकुमार राव यांचे नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT