Court
Court 
पुणे

'जर्मन बेकरी'ची सुनावणी "व्हीसी'द्वारे

सकाळ वृत्तसेवा

यासीन भटकळच्या सुरक्षेच्या कारणामुळे न्यायालयाचा आदेश
पुणे - 'जर्मन बेकरी' बॉंबस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी इंडियन मुजाहिद्दीनचा संस्थापक यासीन भटकळ ऊर्फ शिवानंद (रा. भटकळ, जि. उत्तर कनडा, कर्नाटक) याला व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे (व्हीसी) येथील न्यायालयात हजर करून खटल्याची सुनावणी होणार आहे. विशेष न्यायाधीश आर. एम. पांडे यांनी याबाबतचा आदेश दिला.

सुरक्षेच्या कारणास्तव त्याला सुनावणीसाठी प्रत्येकवेळी हजर करणे अवघड असल्याने भटकळला व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे हजर करावे, असा अर्ज दिल्ली येथील तपास अधिकाऱ्याने केला होता. यावर व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारेच भटकळला न्यायालयात हजर करणे योग्य असल्याचे विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी न्यायालयास सांगितले होते. या सुनावणीसाठी भटकळला प्रत्यक्ष हजर करण्याची मागणी बचाव पक्षाचे वकील ऍड. जहीरखान पठाण यांनी केली होती.

गेल्या 13 फेब्रुवारी 2010 रोजी सायंकाळी सहा वाजून 50 मिनिटांनी जर्मन बेकरी येथे झालेल्या बॉंबस्फोटात 17 जण मृत्युमुखी; तर एकूण 56 जण गंभीर जखमी झाले होते. मृत्यू झालेल्यांमध्ये पाच आणि जखमींमध्ये दहा विदेशी नागरिकांचा समावेश होता. याबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास "एटीएस'कडे सोपविण्यात आला होता. जर्मन बेकरीत भटकळ यानेच बॉंब ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्याच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sam Pitroda: पित्रोदांच्या विधानावरुन PM मोदींचं तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान; म्हणाले, युती...

SRH vs LSG Live Score : तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

पूंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, पाकिस्तानशी थेट कनेक्शनची शक्यता

High Court : ''मुस्लिमांना लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये राहण्याचा अधिकार नाही'', हायकोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Pankaja Munde Audio: "पंकजा मुंडेंच्या ऑडिओ क्लीपची चौकशी करा"; बजरंग सोनावणेंची निवडणूक आयोगाकडं मागणी

SCROLL FOR NEXT