neutrino power
neutrino power sakal
पुणे

German Investment : न्युट्रिनो ऊर्जेसाठी जर्मनीची गुंतवणूक

सम्राट कदम

ऊर्जेचा अमर्याद स्रोत म्हणून नव्यानेच सिद्ध झालेल्या न्यूट्रिनो एनर्जीकडे पाहिले जात आहे.

पुणे - ऊर्जेचा अमर्याद स्रोत म्हणून नव्यानेच सिद्ध झालेल्या न्यूट्रिनो एनर्जीकडे पाहिले जात आहे. ऊर्जेच्या या स्रोतापासून विद्युत ऊर्जा मिळवण्यासाठी `न्यूट्रिनो व्होल्टाईक घट’ तयार करण्यासाठी जर्मनीच्या न्यूट्रिनो एनर्जी ग्रुप भारतात गुंतवणूक करण्यासाठी पुढे सरसावला आहे. या संबंधी पुण्यातील सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिकने (सी-मेट) सहकार्य करार केला आहे. यातूनच पुढे टेस्लाच्या धर्तीवर न्यूट्रिनो एनर्जीवाली ‘पाय-कार’ विकसित करण्यात येणार आहे.

शुक्रवारी (ता. २७) पाषाण रस्त्यावरील सि-मेट मध्ये आयोजित पत्रकार परिषदेला जर्मनीच्या न्युट्रिनो ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. होलगर थॉर्स्टेन, डॉ. थोरस्टन लुडविग, डॉ. आर. के. शर्मा उपस्थित होते. न्यूट्रिनो कणांपासून विद्युत ऊर्जा मिळविणे, ही मानवी इतिहासाला कलाटणी देणारी घटना असेल. या सहकार्य कराराच्या माध्यमातून संशोधन आणि विकासाची कामे केली जाणार असून, त्यातील स्वामित्व हक्क आणि संशोधनाचे हस्तांतरणासंबंधी नियम निश्चित करण्यात आले आहेत.

कराराचे वैशिष्ट्ये -

  • जर्मनीच्या गटाला इलेक्ट्रॉनिक्स पदार्थ, क्वाँटम डॉट्स, द्वीमितीय पदार्थांच्या संशोधनासाठी सी-मेट सहकार्य करणार.

  • सी-मेटमधील शास्त्रज्ञ न्यूट्रिनो व्होल्टाईक घटासाठी विविध पदार्थांची चाचणी करणार.

  • संशोधनाचे भविष्यातील स्वामित्व हक्क आणि उत्पादनासाठी सहकार्य करारात विशेष तरतूद. 

  • न्यट्रिनो एनर्जीच्या वापरातून चालणारी ‘कार’ अर्थात ‘पाय-कार’ विकसित करण्यात येणार.

काय आहे न्यूट्रीनो एनर्जी?

न्यूट्रिनो छोटा तटस्थ मूलभूत कण आहे. सूर्यगर्भातील आण्विक प्रक्रियांद्वारे इलेक्ट्रॉन प्रक्रियांतून न्यूट्रिनोंची सतत निर्मिती होत असते. वैश्विक किरणांच्या भडिमाराने वातावरणाच्या वरच्या थरात इलेक्ट्रॉन तसेच म्युऑन यांच्यातील प्रक्रियांतून न्यूट्रिनोंची निर्मिती निरंतर चालू असते. दर सेकंदाला मानवी शरीरातून तब्बल ५०० खर्व न्युट्रिनो पार होत असतात. दिवसरात्र उपलब्ध असलेल्या या न्यूट्रिनोंना विशिष्ट प्रकारच्या पदार्थांवर आदळून त्यांच्यातील ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करता येते, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. 

मर्यादा : 

1) प्रायोगिक तत्त्वावरील हे संशोधन अजून प्रत्यक्ष वापरात नाही.

2) आर्थिकदृष्ट्या हे तंत्रज्ञान सामान्यांना परवडेल का? याबद्दल पुरेशी माहिती नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: निवडणूक आयोगाची मोठी कारवाई! रत्नागिरीत तीन कोटींची रोकड पकडली

SCROLL FOR NEXT