drown.jpg
drown.jpg 
पुणे

लोणावळ्यात विद्यार्थिनीचा वॉटरपार्कमध्ये बुडून मृत्यू 

सकाळवृत्तसेवा

लोणावळा : येथील कुमार रिसॉर्टस्‌मधील वॉटरपार्कमध्ये फिरायला आलेल्या मुंबईतील एका आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा बुडून मृत्यू झाला. बुधवारी (ता. 15) दुपारी सव्वातीनच्या सुमारास ही घटना घडली. 


नीलू मलेश म्हेत्रे (वय 17, रा. मेगा मशिदीजवळ, अंधेरी पूर्व, मुंबई) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्व येथील स्नेहसदन आश्रमशाळेतील 87 मुले व मुली शाळेच्या बसने बुधवारी लोणावळ्यात फिरायला आले होते. त्यातील काही कुमार रिसॉर्टस्‌मधील वॉटरपार्कमध्ये पोहण्यासाठी उतरले. नीलू वॉटरपार्कच्या कडेला उभी होती. त्या वेळी अन्य विद्यार्थ्यांचा तिला धक्का लागला आणि ती पाण्यात पडली. बसचालक व रिसॉर्टस्‌मधील जीवरक्षकांने तिला तत्काळ बाहेर काढून नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, नीलूचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

घटनेची माहिती बसचालक फादर गोएल पॅट्रिक (वय 46, रा. अंधेरी, मुंबई) यांनी लोणावळा शहर पोलिसांना दिली. सहायक निरीक्षक बी. एस. सांगळे अधिक तपास करीत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

Hadapsar : वैदुवाडी झोपडपट्टीत लागलेल्या आगीत चार झोपड्या जळून खाक

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

SCROLL FOR NEXT