पुणे

'ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण द्यावं'

सकाळवृत्तसेवा

पुणे- ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लावता मराठा समाजाला सरकारने आरक्षण द्यावे अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. पुण्यात फुले स्मारक येथे ते पत्रकारांशी बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, SEBC आणि OBC एकच आहेत, घटनेत OBC हा शब्दच नाही.

एसीबीने अजित पवारांविरोधात प्रतिज्ञापत्र दाखल केल्याबाबतही छगन भुजबळ यांनी प्रतिक्रीय दिली. याबाबत ते म्हणाले की, ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रतिज्ञापत्र सादर करणे याचा अर्थ निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना त्रास द्यायचा हे सरकारचे धोरण आहे. सरकार हे सुडबुद्धीने हे सर्व करत असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. 

दरम्यान, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. परिषदेचे राज्याचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे यांनी सोमवारी (ता. 26) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली होती. या कार्यक्रमाला या परिषदेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून छगन भुजबळ पुण्यात उपस्थित आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT