indapur-2.jpg
indapur-2.jpg 
पुणे

तरटगांव ग्रामपंचायतीत झाली बिनविरोध निवडणूक

डॉ. संदेश शहा

इंदापूर : जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबिले यांच्या पुढाकाराने त्यांच्या मतदार संघातील तरटगांव ग्रामपंचायत बिनविरोध झाली. ग्रामपंचायतीचे नुतन सरपंच पोपट तुकाराम माने तसेच ग्रामपंचायत सदस्य सुरेखा दादासो भांगे, अॅड. शंकर हनुमंत ननवरे, अमोल नारायण माने, राजेंद्र विजय सोनवणे, लक्ष्मी अभिजीत सोनवणे यांचा सत्कार मंगलसिध्दी समूहाचे अध्यक्ष  अॅड. राजेंद्र तांबिले, इंदापूर तालूका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष महारूद्र पाटील, जेष्ठ नेते अशोक घोगरे, कालठण सोसायटीचे माजी अध्यक्ष किसनराव जावळे, हिंगणगाव विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष छगनराव तांबिले, धनंजय तांबिले, मंगेश तांबिले यांच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी अभिजित तांबिले म्हणाले, तरटगावाने निवडणूक बिनविरोध करून गावच्या संपुर्ण विकासास मत दिले आहे. गावचा संपुर्ण विकास करण्यासाठी कटिबध्द आहे. 
यावेळी माजी सरपंच किसन भांगे म्हणाले, गावात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन गट होते. मात्र गाव आदर्श करण्यासाठी दोन्ही गट एकत्र आले. त्यामुळे गावची निवडणूक बिनविरोध झाली. तालुक्यातील आदर्श गाव बनण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. पी. आर. पी. चे अध्यक्ष संजय सोनवणे म्हणाले, उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील तरटगावचे आता ख-या अर्थाने विकासकारण सुरू झाले आहे. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संतोष ननवरे, माजी सरपंच कुबेर भांगे, माजी उपसरपंच बाबूराव भांगे, संजय संभाजी सोनवणे, सौदागर ननवरे, बाळासाहेब सरडे, अनिल भांगे, अनंता ननवरे, बाळासो ननवरे, नागेश भांगे, इंद्रजित भांगे, हनुमंत सोनवणे, सागर ठवरे, गणेश दडस उपस्थित होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BANW vs INDW, T20I: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, राधा यादव-दीप्ती शर्माची धारदार गोलंदाजी

Fact Check : निवणुकीत लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डुकराची चरबी नसते; व्हायरल होत असलेला दावा खोटा

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौसमोर मुंबईनं नांगी टाकली; 5 षटकात 4 फलंदाज तंबूत

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

SCROLL FOR NEXT