fruitmarket
fruitmarket 
पुणे

पावसामुळे वातावरणात झालेल्या बदलामुळे फळांना मागणी नाही; पेरू, चिक्कूच्या दरात घट

सकाळवृत्तसेवा

पुणे - पावसामुळे वातावरणात झालेल्या बदलामुळे फळांना मागणी नाही. त्यामुळे लिंबाच्या भावात गोणीमागे 50 ते 70 रुपयांनी, पेरू आणि चिक्कूच्या भावात अल्पशी घट झाली आहे. आवक घटल्याने केवळ कलिंगडाच्या भावात किलोमागे 4 ते 5 रुपयांनी वाढ झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व फळांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापारी युवराज काची यांनी दिली. 

रविवारी येथील बाजारात केरळ येथून अननस 3 ट्रक, मोसंबी 40 ते 50 टन, संत्री 20 ते 24 टन, डाळिंब 100 टन, पपई 15 ते 20 टेम्पो, लिंबे एक ते दीड हजार गोणी, पेरू 700 क्रेटस्‌, चिक्कू 700 गोणी, कलिंगड 4 ते 5 टेम्पो, सीताफळ 15 ते 20 टन, खरबुजाची 2 ते 3 टेम्पो आवक झाली. 

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : 150-250, अननस (डझन) : 70-270, मोसंबी : (3 डझन) : 160-320, (4 डझन ) : 60-130, संत्री : (10 किलो) : 100-500, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : 40-150, गणेश : 5-25, आरक्ता 10-60. कलिंगड : 10-25, खरबूज : 15-30, पपई : 10-15, चिक्कू : 100-500, पेरू : 250-400, सीताफळ 5-80. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रतीक्षा नवरात्रोत्सवाची...! 
मंदिर सुरू झालेली नाहीत, तसेच लग्न आणि इतर कार्य नसल्याने फुलांना फारसा उठाव नाही. परिणामी फुलांना भाव कमी मिळत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बाजारात माल आणणे कमी केले आहे. येत्या शनिवारी नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. या काळात फुलांना मागणी वाढण्याची शक्‍यता असल्याचा अंदाज अखिल फूल बाजार अडते असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर यांनी वर्तविला आहे. 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : 10-20, गुलछडी : 8-40, अस्टर : जुडी 11-15, सुट्टा 40-60, कापरी : 10-20, शेवंती : 30-70, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : 5-15, गुलछडी काडी : 10-20, डच गुलाब (20 नग) : 30-50, लिलिबंडल : 8-20, जरबेरा : 10-20. बिजली 40-80 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

Latest Marathi News Live Update : मुंबई स्थानकावर अमरावती एक्सप्रेसला किरकोळ आग

SCROLL FOR NEXT