पुणे

#GyanGanesh रोज पस्तीस हजार पोळ्यांची "चपाती एक्‍स्प्रेस'

आशिष तागडे

पुणे - पोळ्या लाटणं हे जिकरीचे काम... पण इथे रोज एक-दोन नव्हे तब्बल 35 हजार पोळ्या लाटल्या जातात..! वेळप्रसंगी हा आकडा 50 हजारांच्या घरातही गेला आहे. ही किमया साधली जाते "देशपांडे स्वयंपाक'घरात ! येथे महिलांच्या श्रमाला प्रतिष्ठा दिली जाते. 

आरती देशपांडे यांच्या पतीची नोकरी नऊ वर्षांपूर्वी अचानक गेली. अर्थार्जनासाठी काय करायचे, हा मोठा प्रश्‍न उभा राहिला. त्या वेळी त्यांच्या विहीण आसावरी देशपांडे मदतीला धावून आल्या. "आपण घरगुती का होईना, व्यवसाय सुरू करू', हा विहीणबाईंचा सल्ला प्रमाण मानून आरती यांनी घरगुती पोळ्यांचा व्यवसाय सुरू केला. आसावरी मदतीला होत्याच. सुरवातीला शंभर-दीडशे पोळ्या तयार करून त्याची आसपास विक्री सुरू केली. पोळीचा दर्जा अनुभवल्यामुळे ही संख्या लवकरच तीनशेच्या घरात गेली. त्या वेळी मुलगा निर्मल याला मदतीला घेऊन हाच व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू करण्याचा चंग आरती यांनी बांधला. 

भांडवलाचा प्रश्‍न वर्षभराने सुटल्यावर "चपाती एक्‍स्प्रेस'ला गती मिळाली. आर्थिक पाठबळाची आवश्‍यकता असलेल्या काही महिलांना बरोबर घेतले. निर्मल सकाळीच पोळ्या घेऊन शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, हॉस्पिटलमध्ये जायचा. कधी-कधी 20-25 पोळ्यांसाठी त्याची तीन-चार किलोमीटरची फेरी व्हायची; परंतु मागे हटायचे नाही, हे मनाशी पक्के ठरविले असल्याने कष्टाची फिकीर नव्हती. 

अडचणींवर मात कशी केली, याबद्दल आरती म्हणाल्या, ""कष्ट कधीच कमी नव्हते; समस्या होती ती पैशांची! आमच्या कामाला 2012 मध्ये उभारी मिळाली. एका मोठ्या आयटी कंपनीच्या कॅन्टीनची ऑर्डर आणि पैसे मिळाले. आमच्या पोळीचा दर्जा पाहून अन्य काही कंपन्यांचीही ऑर्डर यायला सुरवात झाली. काही झाले तरी पोळीचा दर्जा कायम ठेवायचा, हे आमचे ब्रीद आहे.'' 

आमच्याकडे 40 महिला काम करतात. आमचे हे छोटेखानी स्वयंपाकघर एक कुटुंबच आहे. पहाटे साडेतीनला कामाची सुरवात होते अन्‌ सकाळी 11 पर्यंत भटारखाना चालतो. महिलांची ने-आण करण्यासाठी विशेष वाहनव्यवस्था आहे. साध्या पोळ्यांबरोबरच पुरणाच्या, गुळाच्या, खव्याच्या पोळ्याही तयार करतो. पोळ्या तयार केल्यानंतर त्या ग्राहकांपर्यंत पोचविण्यासाठी विशिष्ट आकाराचे डबे आहेत. यामुळे पोळी खूप वेळ नरम राहते अन्‌ त्या वेळेत पोचण्यासाठी "चपाती एक्‍स्प्रेस' तयार केली असल्याचेही त्यांनी सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Election : शहिदांचा अन् जवानांचा अपमान सोलापूरकर करणार का? फडणवीसांची प्रणिती शिंदेवर जोरदार टीका

Nude Image Generator : अ‍ॅपलने अ‍ॅप स्टोअरवरुन काढून टाकले न्यूज इमेज बनवणारे Apps; इन्स्टावर जाहिराती दिसल्यानंतर कारवाई

Shrikant Shinde: 'पंजा'ला मतदानावरून ठाकरे X शिंदे, 'शिल्लक सेना' उल्लेख करत डागली तोफ

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: मोदींच्या कितीही सभा घेतल्या तरी उपयोग होणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

SCROLL FOR NEXT