Hadapsar Railway terminal will be implemented
Hadapsar Railway terminal will be implemented 
पुणे

पुणेकरांसाठी मार्च ठरणार आनंदाचा

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणेकरांसाठी मार्च महिना आनंदाचा ठरणार आहे. कारण, याच महिन्यात रेल्वे प्रशासन हडपसर येथील टर्मिनलचे काम पूर्ण करून प्रवाशांना खूष करणार आहे.

हडपसर रेल्वे टर्मिनल कार्यान्वित होणार
पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प असलेले हडपसर येथील रेल्वे टर्मिनल मार्च महिन्यात कार्यान्वित करण्याचा मध्य रेल्वेचा प्रयत्न आहे. त्यानंतर लांब पल्ल्याच्या गाड्या हडपसरमधून सोडण्यात येतील, अशी माहिती पुणे विभागाच्या व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी दिली.

शर्मा यांची नुकतीच पुणे विभागीय व्यवस्थापकपदी नियुक्ती झाली आहे. विभागातील विविध योजनांची माहिती देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पदावर नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत.

हडपसर रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरण करून तेथे सॅटेलाइट टर्मिनल उभारण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी झाला होता. त्यासाठी रेल्वेला मोठ्या प्रमाणात जागेची आवश्‍यकता होती. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात तेथे जागा उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे हे सॅटेलाइट टर्मिनल तीन हेक्‍टर जागेत तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. २०१६ मध्ये या टर्मिनलला मान्यता मिळाली. त्यानंतर अनेक अडथळ्यांचा सामना करीत त्याचे काम सुरू आहे. 

केंद्र सरकारच्या ‘निर्भया निधी’अंतर्गत पुणे विभागातील रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. 

पुणे स्थानकात सध्या ६१ कॅमेरे असून, आणखी ६३ सीसीटीव्ही बसविण्यात येतील. त्यासाठी सर्व्हे केला जात आहे. उर्वरित १८ स्थानकांवर ५३९ सीसीटीव्ही  बसविले जाणार असल्याची माहिती शर्मा यांनी दिली.

कामासाठी पुरेसा निधी
जागेच्या ताब्यावरून काही लोकांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यामुळे टर्मिनलचे काम काही काळ रखडले होते. मात्र न्यायालयाच्या आदेशाने ते पुन्हा सुरू झाले आहे. स्थानक आवारातील इमारतीचे काम पूर्ण झाले असून, रुळांचे काम सुरू आहे. या कामासाठी पुरेसा निधी आहे. त्यामुळे काम लवकर पूर्ण करू, असे शर्मा यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT