दिवे घाट  
पुणे

Baramati News : हडपसर ते दिवे घाट रस्ता होणार चौपदरी

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील हडपसर ते दिवे घाट या अंतराचे चौपदरीकरण आणि दुरुस्तीसाठी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाने निधी मंजूर केला आहे.

मिलिंद संगई

बारामती - संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील हडपसर ते दिवे घाट या अंतराचे चौपदरीकरण आणि दुरुस्तीसाठी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाने 792.39 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती दिली असून आपल्या पाठपुराव्याला प्रतिसाद देत निधी मंजूर केल्याबद्दल केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. हडपसर ते दिवे घाट पालखी महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होते. रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागते. याशिवाय घाट भाग हा वन विभागाच्या हद्दीत असल्याने रुंदीकरणास अडथळे येत होते.

या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे या सातत्याने या रस्त्याच्या कामासाठी केंद्रीय महामार्ग मंत्रालयाकडे पाठपुरावा करत होत्या. खासदार शरद पवार यांनीही याबाबत केंद्राकडे शब्द टाकला होता. त्याला अपेक्षित यश आले असून निविदा काढण्याचे आदेश देण्यात आले. त्यावेळी 399 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यात आता वाढ करण्यात आली असून 792.39 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

हे काम पुर्ण झाल्यावर हडपसर ते दिवे घाट या मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या बऱ्याच अंशी दूर होईल. पालखी मार्गावरुन मार्गक्रमण करणा-या वारक-यांची गैरसोय दूर होईल, नितिन गडकरी यांचे निधी मंजूर केल्याबद्दल आभार व्यक्त करते.

- सुप्रिया सुळे, खासदार, बारामती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT