jagdale.JPG
jagdale.JPG 
पुणे

हडपसरवासीयांनी सोडला  सुटकेचा निःश्‍वास 

संदीप जगदाळे


पुणे ः परिसरातील अतिक्रमण व वाहतूक कोंडीबाबत "व्हिजन हडपसरच्या' पुढाकारातून घेतलेल्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार कारवाईला सुरुवात झाली आहे. महामार्ग मोकळा झाल्याने हडपसरमधील नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे. 

हडपसरमधील अतिक्रमण व वाहतूक कोंडी हा गंभीर विषय बनला होता. यासंदर्भात नागरिकांनी "व्हिजन हडपसर'च्या माध्यमातून हडपसर सहायक आयुक्त कार्यालयात बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये आमदार चेतन तुपे यांच्यासह महापालिका उपायुक्त माधव जगताप, वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज देशमुख, वाहतूक पोलिस अधिकारी व विविध खात्यांचे अधिकारी सहभागी झाले होते. 

या बैठकीमध्ये "व्हिजन' सदस्यांनी हडपसरमधील वाहतूक व अतिक्रमणाबाबत सविस्तर माहिती देऊन हे प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाला आवाहन केले होते. वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलिस आयुक्त नागनाथ वाकुडे, हडपसरचे वाहतूक पोलिस निरीक्षक राजेंद्र जाधव यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक रघुनाथ जाधव यांच्या सहकार्याने तातडीने उपाययोजना करण्यास सुरवात केली. यामध्ये हडपसरमधील गांधी चौकातील उड्डाण पुलाखाली मजदूर अड्ड्यामुळे गर्दी होत असल्याने हा मजदूर अड्डा माळवाडी येथे हलविण्यात आला आहे, तसेच रस्त्यावर लक्‍झरी बसेस लागत असल्याने या चालक-मालक यांची बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या व खासगी पार्किंगमध्ये बसेस लावण्याबाबत चर्चा करण्यात आली. 
हडपसरमधील रिक्षाथांबे तपासणी सुरू असून, अनधिकृत रिक्षांवर जोरदार कारवाई सुरू केली असून, मोठ्या प्रमाणात रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत, तसेच त्रुटींबाबत रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 

पीएमपीच्या काही चुकीच्या बसथांब्यांची तपासणी सुरू असून, काही थांब्यांच्या जागा बदलण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती पीएमपी व्यवस्थापक सोमनाथ वाघुले यांनी दिली. 

पदपथ व सायकल ट्रॅकवरील अतिक्रमणे काढण्यात आली असून महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत दुकान सोडून बाहेर केलेल्या अतिक्रमणांवर मोठी कारवाई करण्यात आली. येथील अधिकृत पथारी व्यवसायायिकांच्या पुनर्वसनाबाबत चर्चा सुरू झाली असून, त्यांचे पुनर्वसन करण्याबाबत लवकर उपाययोजना करण्यात येणार आहे. 

सिरम कंपनीसमोरील पंक्‍चर बंद करण्यात आले असून, नागरिकांच्या मागणीनुसार दोन तासांऐवजी ते सध्या प्रायोगिक तत्वावर चार तास उघडण्यात येणार आहे. त्यामुळे मांजरी फाटा चौकात होणारा वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल. 
शहराच्या पूर्व भागात निर्माण झालेल्या नागरिकांचा "व्हिजन हडपसर' या दबाव गटाची सकारात्मक चर्चा नागरिकांमध्ये आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात अर्ध्यातासापासून ईव्हीएम बंद

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

Manipur Violence: मणिपूरमध्ये थरार! 2 तासांच्या चकमकीनंतर कुकी दहशतवाद्यांपासून 75 महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT