MADAT.jpeg
MADAT.jpeg 
पुणे

पूरबाधितांना विविध संघटनांकडून मदतीचा हात 

सकाळ वृत्तसेवा

पुणे ः बाणेर, बालेवाडी, औंध, बोपोडी येथील पुराने बाधित झालेल्या कुटुंबांना सर्वच स्तरांमधून मदत दिली जात आहे. यामध्ये अन्नाची पाकिटे, कपडे, औषधे, सॅनिटरी पॅड व इतर आवश्‍यक साहित्य वैयक्तिक पातळीवर लोकप्रतिनिधी, विविध संघटनांसह महापालिकेकडून दिली जात आहे. 

बाणेर- बालेवाडी मेडिकोज असोसिएशन (बीएमए), बाणेर बालेवाडी पाषाण रेसिडेन्शियल असोसिएशन (बीबीपीआरए), औंध विकास मंडळ यांच्यासह रोटरीकडूनही विविध स्वरूपाची मदत दिली केली जात आहे. तर बीएमए व महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात येत आहेत. 

बालेवाडी येथील बालवडकर शाळेतील स्थलांतरित सातशे, इंदिरा गांधी शाळेतील एकशे दहा व बोपोडीतील डॉ. राजेंद्र प्रसाद शाळेतील अकराशे जणांना जेवणासह वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी प्रशासकीय व स्थानिक पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. 
रविवारपासून बोपोडी येथील शाळेत जवळपास 169 जणांची तपासणी करून उपचार केले आहेत. चार रुग्णांसह करीबी नूर महम्मद शेख या अत्यवस्थ ज्येष्ठ महिलेला रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती बढीये यांनी सांगितले. प्रभाग क्रमांक आठ व नऊमधील सर्वच लोकप्रतिनिधीही सर्व ठिकाणच्या नागरिकांना अन्न व पूरक साहित्यांची मदत केली आहे. 
------ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT