पुणे - आवक वाढू लागल्याने रत्नागिरी हापूस आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्यात येऊ लागला आहे. प्रतवारीनुसार अडीचशे ते पाचशे रुपये प्रतिडझन या दराने घाऊक बाजारात विक्री होत आहे. हीच परिस्थिती कर्नाटकमधील आंब्यांची देखील असून मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे.
गुलटेकडी मार्केटयार्डात आठ ते दहा हजार पेटी मिळून रत्नागिरी हापूस आंब्यांची आवक झाली. गेल्या आठवड्यात अक्षय तृतीयामुळे मोठ्या प्रमाणावर आंब्याला मागणी होती. मात्र, बाजारात तयार माल उपलब्ध नसल्यामुळे आंब्यांचे पेटीचे भाव तेजीत होते. मात्र, आवक वाढल्याने आणि तयार मालही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने दर कमी झाले आहेत. प्रतवारीनुसार हे दर असून किमान अडीचशे ते पाचशे रुपये डझन असे दर आहेत, असे अडते करण जाधव आणि अरविंद मोरे यांनी सांगितले.
कर्नाटक येथून आज 18 ते 20 हजार पेटी आणि पाच हजार करंडी एवढी आंब्यांची आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कर्नाटक आंब्याचे दर उतरले आहेत. तयार कर्नाटक हापूस आंब्यांच्या प्रतीडझनाचा दर हा 300 ते 350 रुपयांपर्यंत झाला आहे, असे अडते रोहन उरसळ यांनी सांगितले.
आंब्यांचे दर
रत्नागिरी हापूस तयार ( 4 ते 8 डझन) : 1200 ते 2200
रत्नागिरी हापूस तयार (8 ते 10 डझन) : 1500 ते 2800
कर्नाटक आंबे
कर्नाटक हापूस तयार (4 ते 5 डझन) 700 ते 1200
कर्नाटक पायरी तयार (4 डझन) 600-1000
लालबाग तयार (1 किलो) 30 ते 40
बदाम तयार (1 किलो) 40-50
तोतापुरी तयार (1 किलो) 30 ते 40
मल्लिका तयार (1 किलो) 40 ते 50
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.